सावधान! तुम्हाला Free Diwali Gift चा मेसेज आलाय? तर तुमचे अकाऊंटही होईल रिकामे

159

देशात सध्या दिवाळी सणाचे वातावरण तयार झाले आहे. अशावेळी सरकारी सायबर एजन्सीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. Free Diwali Gift चा मेसेज तुम्हाला आला असेल तर आताच सावध व्हा. अशा मेसेजवर चुकूनही क्लिक करु नका, नाहीतर तुमचे अकाऊंट रिकामे होईल.

दिवाळीनिमीत्त भेटवस्तूची ऑफर असा मेसेज आला असेल तर अलर्ट व्हा. चीनी वेबसाईट यूजर्सची गोपनीय माहिती चोरण्याची युक्ती असू शकते. भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत CERT-In ने यूजर्सना मोठ्या ब्रॅंड्सना टार्गेट करणारे अॅडवेअर आणि फसव्या फिशिंग आणि ग्राहकांना फसवणा-या घोटाळ्यांपासून सावध केले. त्यामुळे तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

( हेही वाचा: हलाल उत्पादनांची सक्ती का? ट्विटरवर सुरू आहे ‘हलालमुक्त दिवाळी’ ट्रेंड )

महिला सर्वाधिक टार्गेटवर 

विविध सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर फेक मेसेज फिरत आहेत. सणासुदीत ऑफरचा खोटा दावा करुन यूजर्सना गिफ्ट लिंक्स आणि बक्षिसे देऊन भुरळ घालतात. त्यामुळे सावध व्हा. तुमची फसवणूक करणारे बहुतेक महिलांना टार्गेट करत आहेत. त्यांना व्हाॅट्सअॅप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम खात्यांवरील समवयस्कांमध्ये लिंक शेअर करण्यास सांगत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.