दिवाळीनिमित्त उडवलेले राॅकेट घरापासून काही अंतरावर बसलेल्या 19 वर्षांच्या तरुणाच्या उजव्या डोळ्यावरच आल्याची घटना मावसाळा येथे सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. त्यामुळे तरुणाची पापणी फाटली असून, डोळ्यात रक्त गोठले आहे. डोळ्यातील पडदा कसा आहे, हे 3 ते 4 दिवसानंतर स्पष्ट होणार असल्याचे घाटीतील डाॅक्टरांनी सांगितले.
करण घाटे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयातील नेत्र विभागात उपचार सुरु आहेत. तो सोमवारी घराबाहेर बसला असताना काही कळण्याच्या आतच एक राॅकेट थेट त्याच्या उजव्या डोळ्यावर आदळले. पुढे ते त्याच्यापासून काही अंतरावर जाऊन फुटले. या सगळ्यात त्याच्या उजव्या डोळ्याला तसेच पापणीला गंभीर दुखापत झाली. पापणीला टाके मारण्यात आले आहेत, तर डोळ्यात रक्त गोठल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: ST महामंडळाच्या ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या होणार दाखल )
11 रुग्णांवर उपचार
घाटीत सोमवारी रात्री फटाक्यांमुळे भाजलेल्या एकूण 11 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात उपचारानंतर 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाला दाखल करावे लागले, असे घाटीतील डाॅक्टरांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community