Diwali 2022: ‘अशी’ करा दिवाळीत ‘Smart Shopping’

163

दिवाळीपूर्वी बाजारात सर्वत्र खरेदीची धूम दिसत आहे. बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. सर्वत्र विविध ऑफर्सचा पाऊस पडताना दिसतो. मात्र, सूट व सवलतींच्या नादाने लोक अनेकदा अनावश्यक खरेदी करुन आपले बजेट बिघडवून घेत असतात, स्मार्ट पद्धतीने नियोजन करुन खरेदी केली, तर अनावश्यक खर्च टाळून सणही उत्साहात साजरा होईल. सणासुदीच्या काळातील खर्च कसा नियंत्रणात ठेवावा, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

सणाच्या खर्चाचे बजेट निश्चित करा

सर्वप्रथम सणाच्या खर्चाचे बजेट निश्चित करा. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचा खर्च टळेल. नीट नियोजन केले तर मिळणा-या बोनसमध्येही दिवळी आनंदात साजरी होऊ शकते. त्यासाठी आपल्या खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करा आणि कटाक्षाने पाळा. आवश्यकतेनुसार, वस्तूंचा क्रम ठरवा. गरजेच्या वस्तूंचा क्रम आधी लावा.

Discount च्या नादात अनावश्यक खर्च टाळा

E-Commerce कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी बंपर सूट व सवलती जाहीर केल्या आहेत. गरजेच्या वस्तू खरेदी केल्या, तर सूट फायदेशीर ठरत असते. कधी कधी अनावश्यक खर्च होण्यास सूट व सवलती कारणीभूत होतात. गरज नसतानाही काही वस्तूंची खरेदी होते. ते टाळा. कंपन्या तुम्हाला खरेदीला उद्युक्त करण्यासाठी सूट जाहीर करत असतात , हे लक्षात ठेवा.

( हेही वाचा: तु्म्ही सुद्धा ‘या’ बॅंकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी )

Budget मध्ये खरेदी करा, EMI पर्याय निवडा

अनेक लोक सणाच्या काळात Credit Card द्वारे खरेदी करतात. बोनस मिळेल त्यातील बिल अदा करु, असा त्यांचा यामगचा विचार असतो. ही अजिबात चांगली सवय नाही. भविष्यातील कमाईवर कधीच खर्च करु नका. हातात जेवढा पैसा आहे, तेवढ्यातच खरेदी करा. डाऊन पेमेंटवर मोफत सहायक उपकरणाऐवजी शून्य टक्के EMIचा पर्याय निवडा. जेवढे बजेट आहे, तेवढीच खरेदी करा.

खरेदीपूर्वी तुलना करा

खरेदी करण्यापूर्वी वस्तूंच्या किमतींची इतर वेबसाइटवर तुलना करा. याशिवाय ऑनलाइन-ऑफलाइन अशी तुलनाही करा. काही वस्तू ई-काॅमर्स वेबसाइटवर स्वस्त मिळू शकतात, तर काही वस्तू स्थानिक दुकानदार स्वस्त देऊ शकतात. त्यामुळे खरेदीसाठी थोडा गृहपाठ आवश्यक आहे. वस्तू जेथे स्वस्त मिळेल, तेथूनच खरेदी करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.