महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. परंतु, अधिसंख्य पदावरील 590 कर्मचारी व अधिकारी बोनसपासून वंचित राहणार आहेत. महामंडळाने बोनस संदर्भात परिपत्रक जारी करत अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांना दिवाळी भेट रक्कम देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 2016 पासून सानूग्रह अनुदान दिवाळी भेट म्हणून एसटी कर्मचा-यांना देण्यास सुरुवात केली आहे.
एसटीच्या अधिकारी वर्गाला सरकारने दिवाळीची भेट दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचा-यांना सरसकट 5 हजार इतकी रक्कम बोनस देण्याचा निर्णय महामंडळाने दिला. यासाठी राज्य सरकारने 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 87 हजारांहून अधिक कर्मचारी वर्गांना होणार आहे. परंतु एकीकडे हा निर्णय घेतला असताना, दुसरीकडे मात्र एसटीतील अधिसंख्य पदावरील 590 कर्मचारी व अधिकारी बोनसपासून वंचित राहणार आहेत.
( हेही वाचा: गूगलला भारताने ठोठावला 1 हजार 337 कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण )
Join Our WhatsApp Community