देशभरात दिवाळी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात वसुबारसपासून दिवाळी घरा-घरात साजरी केली जाते. राज्यातच नाहीतर आता परदेशातही दिवाळी साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर भारतातील दिवाळीच्या फराळाला विदेशातही मागणी असते. मात्र भारतात अशीही काही ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी दिवाळी साजरीच केली जात नाही. ऐकूण कदाचित तुम्हाला नवल वाटेल पण हे खरं आहे. कोणतं आहे ते ठिकाण आणि काय आहे त्यामागील कारणं…
(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या ‘या’ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)
भारतात काही ठिकाणी दिपावलीत या ठिकाणांवर ना लक्ष्मी पूजन होते. ना फटाके फोडले जातात ना दिव्यांच्या रोषणाई बघायला मिळते. ते ठिकाण म्हणजे केरळ राज्य. केरळ राज्यात इतर ठिकाणांसारखा दिवाळीचा उत्साह बघायला मिळत नाही. मात्र केरळमध्ये ओणमपासून ते ख्रिसमस आणि शिवरात्रीचा मोठा जल्लोष असून हे सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. केरळमध्ये फक्त कोच्चीमध्ये दिवाळी साजरी केली जाते, या ठिकाणीच घरांसमोर दिवे लावल्याचे बघायला मिळते.
काय आहे दिवाळी साजरी न होण्याचे कारण
केरळमध्ये दिपावली साजरी न होण्याचे अनेक कारणे आहेत. यापैकी मुख्य कारण म्हणजे केरळमध्ये महाबलीचे राज्य होते. महाबली असूर होता त्यामुळे तेथे त्याचीच पूजा केली जाते. दिवाळी साजरी करण्याचे कारण म्हणजे रावणावर रामाचा विजय झाल्याचा दिवस. अशात एका राक्षसाचा पराभूत होण्याचा दिवस केरळमधील लोक साजरा करत नसल्याचे सांगितले जाते. तर दूसरीकडे केरळ हिंदू धर्माचे लोक कमी आहेत. त्यामुळे इथे दिपावलीचा जल्लोष पाहिला मिळत नाही.
Join Our WhatsApp Community