Diwali 2023 : तुम्हाला माहित आहे का दिवाळीत किल्ला का बनवला जातो?

362
Diwali 2023 : तुम्हाला माहित आहे का दिवाळीत किल्ला का बनवला जातो?

अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी (Diwali 2023) या सणाकडे पाहिलं जातं. दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळ, नवीन कपडे, मिठाई, भेटवस्तू, रांगोळी या सगळ्यांसोबत ‘किल्ले’ यांचीही विशेष चर्चा असते. गेल्या काही वर्षांपासून गावाप्रमाणेच शहरातही दिवाळीच्या निमित्ताने किल्ले केले जातात. मात्र दिवाळीतच हे किल्ले का बनवले जातात हे तुम्हाला माहित आहे का?

आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.

आपल्या इतिहासातील (Diwali 2023) अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमा, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव, पराक्रम, आक्रमण या सर्व गोष्टींचे हे किल्ले साक्षीदार आहेत. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी नेहमी एक उदाहरण देतात.

(हेही वाचा – Team India Diwali Party : असं केलं टीम इंडियाने दिवाळी सेलिब्रेशन)

ते असं सांगतात की, “पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जायचे, मग ते दिवाळीच्या दिवसांमध्ये लहान मुलांना त्या किल्ल्याचा (Diwali 2023) इतिहास सांगत होते. यावेळी ते त्या किल्ल्याबद्दल, त्याच्या बांधकामाबद्दल, त्यावर असणारे बुरुज याची माहिती गोष्टीच्या रुपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं त्या किल्ल्याची प्रतिकृती बनवायचे.

“किल्ला (Diwali 2023) तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. शिवाय मुलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये एक विरंगुळाही मिळत होता. ही गोष्ट पुढे वर्षानुवर्षे सुरु राहिली आणि परंपरा बनली.

(हेही वाचा – NMMT: ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, दिवाळीनिमित्त एनएमएमटीची भेट)

किल्ला कसा बनवायचा?

गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण, चिकट धान्याचे पिठ अशा गोष्टी एकत्र करुन एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. हा किल्ला तयार करताना गल्लीत मुलांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवली जाते. काही जण हे किल्ला बांधणी करतात. तर काही साहित्य आणण्याचे काम करतात. दुसरे दोघं गावातील शिंप्याकडून ध्वज तयार करुन आणतात. काही जण कुंभाराकडून किल्ल्यावर (Diwali 2023) ठेवायला मुर्ती तयार करुन आणतात.

पुढे मग किल्ला बांधणी झाली की, गेरु चुणा वापरुन किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते. गुंजा, करडई अशा धान्यांनी नक्षीकाम केल्या जातं. मग किल्लावर ध्वज लावले जातात. मुर्ती ठेवल्या जातात. संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते. (Diwali 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.