Diwali 2024 : पथ्ये पाळा आणि दिवाळी फराळावर मनसोक्त ताव मारा!

46
Diwali 2024 : पथ्ये पाळा आणि दिवाळी फराळावर मनसोक्त ताव मारा!
Diwali 2024 : पथ्ये पाळा आणि दिवाळी फराळावर मनसोक्त ताव मारा!
  • आकांक्षा डिंगरे

दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट आणि चविष्ट फराळाचे एक भरलेलं ताट! दिवाळीचा उत्सव प्रत्येकासाठी आनंदाचा सण असतो; पण याचबरोबर त्या काळात आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. दिवाळीतील फराळाचे प्रमाण आणि विविधता यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. (Diwali 2024)

दिवाळी फराळामध्ये चिवडा, चकली, लाडू, करंज्या आणि बरेच काही असते. हे पदार्थ स्वादिष्ट असतात; पण त्यात साखर, तूप, आणि मैद्याचे प्रमाण अधिक असल्याने फराळाचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याचा, रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये वाढ होण्याचा आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवाळी फराळाचा आनंद घ्यायचा असेल, तर काही पथ्ये पाळणे आणि स्वतःला काही नियम घालून घेणे आवश्यकच आहे. (Diwali 2024)

(हेही वाचा – IndiGo Flight : इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी)

…असा खा दिवाळी फराळ!
  1. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या फराळात तूप आणि साखर यांचे प्रमाण कमी असलेले पदार्थ निवडा. त्यामुळे बाजारातील वेगवेगळ्या मिठाई अधिक प्रमाणात खाण्यापेक्षा कडधान्यांचा वापर करून बनवलेले फराळाचे पदार्थ खा.
  2. बाहेरच्या खाद्यपदार्थांपेक्षा घरच्या पदार्थांची निवड करा. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकृतीला मानवेल, अशा पदार्थांपासून बनवलेले पदार्थ खाता येतील. तसेच ज्या पदार्थांचे अपथ्य आहे, ते टाळता येतील.
  3. फराळाचे पदार्थ एक वेळी भरपूर प्रमाणात खाण्याऐवजी थोडे थोडे खा.

(हेही वाचा – Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!)

नियमित व्यायाम व आहाराकडे लक्ष द्या !
  1. दिवाळीत फळे आणि भाज्या खाण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेल्या पोषण तत्त्वांचे प्रमाण वाढवता येईल.
  2. या दिवसांत आहारात बरेच बदल होत असल्यामुळे आवर्जुन भरपूर पाणी प्या.
  3. दिवाळीच्या उत्सवात व्यायाम करण्याचे तुमचे रुटीन कायम ठेवा. नियमित ३० मिनिटे चालणे किंवा तुम्ही नेहमी करत असलेले व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
  4. या काळात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्सचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.

योग्य प्रमाणात फराळ आणि आहार घेऊन तुम्ही दिवाळी सणाचा आनंद घेऊ शकता आणि आरोग्याचीही काळजी घेऊ शकता.

(लेखिका झायवी व्हेंचर्समध्ये आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.