माणसाला सणांचे आकर्षण फार पूर्वीपासून असावे. त्यात दिवाळी हा मोठा सण. दिवाळी म्हणजे जोश, दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे मनामनांत वाहणारे चैतन्य! मनातील अंधार दूर करत दिवाळी येते आणि तना-मनाला प्रकाशाने उजळून टाकते. दिवाळी हा उत्सव आहे निसर्गातील समृद्धीचा, आपल्या परंपरांचा आणि माणसांतील हळूवार नात्यांचा.परंपरेनं पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. (Diwali Padwa)
या दिवशी लक्ष्मीने श्रीविष्णूचे औक्षण केले. त्याने आपल्या प्रिय पत्नीला, लक्ष्मीला अलंकार इत्यादी भेट दिले, अशी कथा आहे. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीने एकमेकांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, त्या नात्याचा आदर करावा, अशी पद्धत पडली. पाडव्याची ओवाळणी हा विषय कोणत्याही वयातील स्त्रीचा आवडीचा. नवीन लग्न झालेल्या नवरीला दिवाळसणाचे कोण कौतुक! पहिल्या पाडव्याला अप्रूप असते नवीन नात्याचे. दोघांनी मिळून हा सण साजरा करायचा. नावीन्य, आनंद, हुरहूर अशा सगळ्यांच भावना तिच्या मनात दाटलेल्या असतात.
स्त्रीनं पुरुषांच्या बरोबरीनं किंवा थोडेसे अधिकच सर्वच क्षेत्रांत यशाची शिखरं गाठली आहेत. तरी आपलं घरकुल प्रेमानं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन डोळय़ांत तेल घालून करणारी, कुटुंबातलं सामंजस्य, नात्यांतला स्नेह यांची जोपासना जाणीवपूर्वक करणारी ही तिची भूमिका ती आजही तितक्याच जिव्हाळय़ानं साकारते आहे. तिची ही शक्ती, तिचं हे सामथ्र्य जाणूनच पती त्याच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो.
(हेही वाचा : Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस)
मुळात स्त्रियांना सरप्राईझ प्रचंड आवडतात. त्यामुळे असे सीक्रेट प्लॅन करायचे असतील तर सध्या ऑनलाइन आणि ऑफलाईन अनेक पर्याय आहेत. जाणून घेऊयात काय आहेत ते
साडी किंवा ड्रेस खरेदी
बायकोला देण्यासाठी अनेक पर्याय अनेक प्रकारे उपलब्ध आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे साडी किंवा ड्रेस याचा. हा तर कधीही महिला वर्गाला आवडणारा विषय आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला त्यांना आवडणारे रंग, नवे ट्रेंड, रंग, पॅटर्न याबाबत नेमकी माहिती असणे गरजेचे आहे.
दागिने खरेदी
दागिने हा तर प्रत्येक महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लक्षात ठेवा आणि तिला आवडणारा एखादा दागिना खरेदी करा. अर्थात त्याआधी त्यांच्या किमती विषयी चांगला अभ्यास कराल. म्हणजेच तुमच्या बजेट प्रमाणेच तुम्हाला दागिने घेता येतील. अन्यथा तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागेल.
गृहोपयोगी वस्तूची भेट
घरात अतिशय आवश्यक अशी जी वस्तू ती गेल्या काही दिवस किंवा महिन्यांपासून मागते आहे, ती तिला पाडव्याच्या दिवशी आणून देऊन सरप्राइज करा. ती आणून दिल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसेलच; पण केवळ तुम्ही ती वस्तू लक्षात ठेवलीत, यामुळेही तिला भरून येईल. कधीतरी अशा पद्धतीनं तिला अचानक भावुक करायला काहीच हरकत नाही.
हेही पहा –