D’Mart Store : ‘असं’ आहे डीमार्ट दुकानांचं भारतातील साम्राज्य

D'Mart Store : डीमार्ट ही भारतातील एक लोकप्रिय हायपरसुपर मार्केट साखळी आहे

168
D'Mart Store : ‘असं’ आहे डीमार्ट दुकानांचं भारतातील साम्राज्य
D'Mart Store : ‘असं’ आहे डीमार्ट दुकानांचं भारतातील साम्राज्य
  • ऋजुता लुकतुके

गेल्याच महिन्यात डीमार्ट (D’Mart Store) या हायपरसुपर मार्केटचं एक दुकान चेन्नईतही सुरू झालं. मुंबईत सुरू झालेला डीमार्टचा प्रवास म्हणता म्हणता २० राज्यांमध्ये पोहोचला आहे. २०१७ च्या कंपनीच्या आयपीओनंतर विस्तार अव्याहत सुरूच आहे. ॲव्हेन्यू सुपर मार्केट्स ही डीमार्टची मुख्य कंपनी आहे. राधाकिशन दमानी यांनी २००२ मध्ये पवईत सुरू केलेल्या पहिल्या दुकानापासून ते चेन्नईतील फ्रँचाईजीपर्यंतचा प्रवास समजून घेऊया.

(हेही वाचा- ISRO: आता भारताला ऐकू येणार पृथ्वीच्या हृदयाचे ठोके, इस्रो काय सरप्राईज देणार?)

१९९९ मध्ये राधाकिशन दमानी यांनी अपना बाझारची एक फ्रँचाईजी नवी मुंबईत नेरुळ इथं सुरू केली होती. पण, त्यातील बिझिनेस मॉडेल त्यांना आवडले नाही. पण, हायपर मार्केटची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांनी त्यावर काम केलं आणि २००२ मध्ये पवईत पहिलं डीमार्ट सुरू केलं. फ्रँचाईजी तत्त्वावर वॉलमार्टप्रमाणे चालणारं हे देशातील पहिलं आधुनिक हायपर स्टोअर होतं.  (D’Mart Store)

२०१७ मध्ये ॲव्हेन्यू सुपर मार्टचा आयपोही आला. आणि तिथून डीमार्टचा विस्तारही सुरू झाला. अलीकडेच कंपनीने तामिळनाडूच्या कोईम्बतूर इथं आपलं ३६९ वं दुकान स्थापन केलं. येत्या आर्थिक वर्षांत आणखी २२ दुकानं सुरू करण्याचा संकल्पही कंपनीने सोडला आहे. (D’Mart Store)

(हेही वाचा- Kolkata Rape Case: १७ ऑगस्ट रोजी दवाखाने बंद राहणार, IMAची देशव्यापी बंदची हाक)

किराणा सामानासह जीवनावश्यक सगळ्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून आणि तुलनेनं स्वस्त दर देऊ करत डीमार्टने भारतीय बाजारात क्रांती केली आहे. डी-मार्ट रेडी ही कंपनीने अलीकडेच सुरू केलेली सेवाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. अशावेळी दुकानांची संख्या येत्या काही वर्षांत १,५०० पर्यंत जाईल असा अंदाज प्रभूदास लिलाधर या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. (D’Mart Store)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.