ज्ञानवापीसंदर्भातील नवा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयाकडे; 30 मे रोजी होणार सुनावणी

89

ज्ञानवापी संदर्भातील नवा खटला आता फास्ट ट्रॅक न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. वाराणसी न्यायालयातील सुनावणी आता फास्ट ट्रॅक न्यायालयात केली जाणार आहे. विश्वेश्वराच्या ठिकाणी पुजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या नव्या याचिकेवर फास्ट ट्रॅक न्यायालयात 30 मे रोजी सुनावणी घेतला जाणार आहे.

कर्नाटकातही मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा

सध्या देशभरात ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. वाराणसीच्या या वादादरम्यान, कर्नाटकातील मंगळुरूच्या एका मशिदीच्या खाली हिंदू मंदिरांसारखी स्थापत्य रचना सापडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.

( हेही वाचा ओबीसी मोर्चादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील, पडळकर, दरेकर, गिरीश महाजन पोलिसांच्या ताब्यात )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.