संतूर वाद्याला लोकप्रियता मिळवून देणारे प्रसिद्ध संगीतकार Pandit Shivkumar sharmaयांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

35
संतूर वाद्याला लोकप्रियता मिळवून देणारे प्रसिद्ध संगीतकार Pandit Shivkumar sharmaयांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?
संतूर वाद्याला लोकप्रियता मिळवून देणारे प्रसिद्ध संगीतकार Pandit Shivkumar sharmaयांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

शिवकुमार शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मू येथे झाला. शिवकुमार शर्मा यांच्या आई, श्रीमती उमा दत्त शर्मा बनारस घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या ४थ्या वर्षी त्यांच्या वडिलांकडून गाणे आणि तबला शिकण्यास सुरुवात केली. (Pandit Shivkumar Sharma )

आज संतूरच्या लोकप्रियतेचे श्रेय शिवकुमार शर्मा यांना जाते. भारतीय शास्त्रीय संगीतासाठी संतूर सुयोग्य बनवण्यासाठी त्यात काही बदल केले. शिवकुमार शर्मा यांनी त्यांचे वडील उमदत्त शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतले. पुढे संतूर वाजवण्याचे तंत्र आणि स्वर यात सुधारणा केली. त्यांच्यामुळेच काश्मिरी लोकवाद्याला प्रसिद्धी मिळाली. शिवकुमार शर्माजींनी ध्रुपद, ख्याल आणि ठुमरी इत्यादीचेही शिक्षण घेतले होते. (Pandit Shivkumar Sharma )

(हेही वाचा- Maharashtra Weather : वातावरणातला गारठा वाढणार; राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?)

१९५५ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी मुंबईत संतूर वादनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर लोकांना संतूरचे सूर आवडू लागले. पुढे १९५६ मध्ये त्यांनी “झनक झनक पायल बाजे” चित्रपटासाठी संगीत दिले. त्यानंतर १९६० मध्ये एक अल्बम रिलीज झाला. पंडित शिवकुमार यांनी आरडी बर्मन यांच्या विनंतीवरून गाईड चित्रपटातील ‘मोसे छल किए जाए’ या लोकप्रिय गाण्यात तबला वाजवला होता आणि हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. (Pandit Shivkumar Sharma )

पंडितजींच्या पत्नीचे नाव मनोरमा शर्मा असे आहे. त्यांना दोन मुलगे आहेत. शिवकुमार शर्मा यांनी त्यांचा मुलगा राहुल शर्मा यांना आपला शिष्य बनवले आणि संतूर वादनात प्रवीण केले. वडील-मुलगा ही जोडी १९९६ पासून संतूर वादन उद्योगात एकत्र काम करत होते. शिवकुमार शर्मा यांनी फासले, सिलसिला, लम्हे, चांदनी, डर इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध संगीत दिले आहे. (Pandit Shivkumar Sharma)

(हेही वाचा- Scientist Kidnapped : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण; पाकच्या चिंतेत वाढ)

शिवकुमार शर्मा यांना १९९१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. यासोबतच, त्यांना १९८५ मध्ये अमेरिकेतील बाल्टिमोरचे मानद नागरिकत्व देण्यात आले आणि १९८६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय संगीतकार आणि प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे १० मे २०२२ रोजी मुंबईतील एका रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. भारताच्या पंतप्रधानांसह, देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनीही या दुःखाच्या वेळी शोक व्यक्त केला आहे. (Pandit Shivkumar Sharma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.