आसाममधले एक प्रचलित नाव म्हणजे इंद्र बनिया (Indra Bania). त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९४२ रोजी आसाममधील उत्तर लखिमपूर येथे झाला. ते स्वदेशी ब्रिटियल बनिया होते. आसाममध्ये अनुसूचित जाती म्हणून ओळखला जाणारा स्थानिक समुदाय आहे. १९६०च्या दशकापासून बनिया यांना आसाम तसेच ईशान्य भारतात नाटकाच्या क्षेत्रामुळे ओळखले जाऊ लागले.
१९६४पासून ते ऑल इंडिया रेडिओ, गुवाहाटीचे नियमित कलाकार झाले आणि १९७० च्या दशकात गोवर्धन चरित या नाटकात मुख्य भूमिका केली. त्यामुळे त्यांना आसाममध्ये खूपच प्रसिद्धी मिळाली. ऑल इंडिया रेडिओच्या मोइनार संसंगबाद या नाटकातील अभिनयामुळे तर ते घराघरात पोहोचले.
स्टँड अप कॉमेडियन म्हणून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली
प्रारंभिक दिवसांत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी गुवाहाटी येथे आले. आपले शिक्षण सुरू असतानाच त्यांनी स्टँड अप कॉमेडियन म्हणून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. संपूर्ण आसाममध्ये विनोदी शो करु लागले आणि याच काळात ते नावारुपाला आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कलासाधनेसोबतच त्यांनी आसाम राज्याच्या विद्युत मंडळात काम केले. बनिया (Indra Bania) यांनी चार दशकांहून अधिक काळ चित्रपटात काम केले. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ४० हून अधिक आसामी चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त त्यांनी काही पुरस्कार विजेते चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. गुवाहाटी येथील ऐक्यतान या हौशी थिएटर ग्रुपशी त्यांचा जवळचा संबंध होता.
Join Our WhatsApp Community