गुरु गोविंदजी हे शिखांचे दहावे गुरु होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची ११ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु म्हणून घोषणा करण्यात आली. १६९९ मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली, जी शीखांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना होती. (Guru Gobind Singh)
(हेही वाचा- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या तीन महिन्यांत ?; CM Devendra Fadnavis यांचे वक्तव्य चर्चेत)
गुरु ग्रंथ साहिब जी हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ गुरू गोविंद सिंग यांनी स्वतः पूर्ण केला. विचित्र नाटक हे त्यांचे आत्मचरित्र मानले जाते. हा दशम ग्रंथाचा एक भाग आहे, जो गुरु गोविंद सिंग जी यांच्या कार्यांचे संकलन आहे. त्यांनी मुघल आणि त्यांच्या साथीदारांशी १४ लढाया केल्या. (Guru Gobind Singh)
त्यांचे शिक्षण शिवालिक डोंगरात वसलेल्या चक्क नानकी या ठिकाणी सुरू झाले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. त्यांनी फारसी, संस्कृतचे अध्यापन केले आणि लष्करी कौशल्येही आत्मसात केली. गुरु गोविंद नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागरणाचा संदेश दिला. (Guru Gobind Singh)
गुरु गोविंद सिंग जी एक महान लेखक, विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. श्री गुरु गोविंद सिंग यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांच्या दरबारात ५२ कवी आणि लेखक उपस्थित असत, म्हणून त्यांना “संत सैनिक” असेही म्हणतात. त्यांनी नेहमीच सर्वांना प्रेम, एकता आणि बंधुत्त्वाचा संदेश दिला. (Guru Gobind Singh)
(हेही वाचा- Ravindra Jadeja : विराटनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजाला केलं ‘टार्गेट)
“गुरु गोविंद सिंग जयंती” हा दिवस जगभरातील शीख लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील सर्व गुरुद्वारांना सजवले जाते. शीख भाविक त्यांच्या कुटुंबासोबत गुरुद्वारामध्ये प्रार्थना, भजन आणि कीर्तन करण्यासाठी जातात. या दिवशी “नानक वाणी”चे पठण केले जाते आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये दानधर्म इत्यादी सर्व लोककल्याणकारी कामे केली जातात. या दिवशी देश-विदेशात स्थापित सर्व गुरुद्वारांमध्ये लंगर ठेवला जातो, ज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुरुद्वारांमध्ये जाऊन गुरु गोविंद सिंगजींचा महाप्रसाद घेतात. (Guru Gobind Singh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community