‘मुंबई लोकल’च्या Odd वेळांमागचं गणित माहीत आहे का?

128

‘प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 7 वाजून 11 मिनिटांची 12 डब्ब्यांची जलद लोकल आहे.’ ,’मी सकाळी कल्याण स्टेशनवरून 5.45 ची ट्रेन पकडते…’, ‘तुम्ही संध्याकाळी 6.52च्या ट्रेननी येत का नाही, त्या गाडीला गर्दी कमी असते’ किंवा ‘5.12ची एसी लोकल आज लेट होती…’, अशा चर्चा लोकल प्रवास करताना आपण रोजच करतो किंवा ऐकतो. पण तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? की मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या या लोकलच्या वेळा अशा ऑड का असतात?

(हेही वाचा –  ‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या ‘एसटी’चा ‘कलरफूल’ प्रवास!)

मुंबई हे शहर स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरात खेड्या-पाड्यातील लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, लाखो लोकं मुंबईत प्रवास करण्यासाठी मुंबई लोकलवर अवलंबून असतात. मुंबई आणि मुंबई उपनगर हे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या मुख्य तीन रेल्वे मार्गांवर विस्तारलेले आहे. या तिन्ही मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या वेळा या शक्यतो ऑड असल्याचेच तुम्हाला बघायला मिळेल. ‘मुंबई लोकल’च्या Odd वेळांमागचं गणित कसं जुळवलं जातं जाणून घ्या…

indicator

मुंबई लोकल प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई लोकलचे हे ऑड टायमिंग ट्रेनची वारंवारता (Frequency of train) टर्मिनल, विभागीय क्षमता (sectional capacity) यांचं गणित लक्षात घेऊन ठरवली जाते. यासह अनेक तांत्रिक बाबी आणि रेल्वे मार्गावर असणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या संकेतांवर आधारलेले असते. तसेच लोकल ट्रेनच्या वेळा ठरवणं हे खूप किचकट काम असते. यासाठी उत्तम मनुष्यबळ असणाऱ्या टीमची आवश्यकता असते. ज्या मार्गावरून लोकल ट्रेन जात असते त्यावरूनच लांब पल्ल्याची गाडी (एक्स्प्रेस) देखील धावत असते. त्यामुळे लोकलचे टायमिंग ठरवताना एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळा देखील विचारात घेतल्या जातात.

railway 1

लोकलचे टायमिंग ठरवताना सेकंद, मिनिटांचा विचार करून एखाद्या विशिष्ट मार्गावर कोणती लांब पल्ल्याची गाडी (एक्स्प्रेस) धावणार आहे का? ज्या रेल्वे स्थानकावरून जी लोकल सुटणार आणि ज्या स्थानकापर्यंत ती जाणार आहे, अशा दोन्ही वेळा लक्षात घेतल्या जातात. तसेच यामध्ये एखादी सेमी फास्ट लोकल असेल तर ती एका ठराविक स्थानकानंतर फास्ट किंवा स्लो होते, अशावेळामध्ये एक्स्प्रेस गाडीचे नियोजन करण्यात आलेले असते. थोडक्यात या ऑड दिसणाऱ्या वेळा एकमेकांवर अवलंबून असतात.

( हेही वाचा – ‘लालपरी’ नव्या रंगात! ‘या’ मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक बस)

ज्यावेळी प्रवाशांची गर्दी सर्वाधिक असते म्हणजेच प्रवाशांचा Peak hours जरी असला तरी त्यावेळी लोकल ट्रेनला प्राधान्य दिले जाते. या दरम्यान, लांब पल्ल्यांच्या गाड्या या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सोडल्या जातात. त्यामुळे या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळांवर देखील लोकलचे टायमिंग विशेषतः ठरविले जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.