तुम्हाला माहिती आहे का? इस्रायलमध्ये मराठी बोलणारे पुष्कळ लोक राहतात…

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

ज्ञानदेवांनी इतक्या आत्मविश्वासाने हे लिहून ठेवलेलं आहे की हे वाचताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हजार हत्तींचं बळ संचारतं. ज्ञानदेवांनी त्याकाळी बंड पुकारुन भगवद्गीता मराठीत आणली आणि मराठी भाषेला संजीवनी प्रदान केली. आज जगभरात मराठी बोलणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात इस्रायल हे राष्ट्र आघाडीवर आहे. इस्रायलमध्ये ज्यू असलेली मराठी माणसं आढळतात हे विशेष.

१४ मे १९४८ ला हा देश पूर्णपणे निर्माण झाला. फिलिस्थानचे तीन भाग केले गेले. एक भाग यहूदी बांधवांना इस्रायलच्य अरुपात मिळाला आणि बाकीचे दोन भाग अरबांना मिळाले. अशाप्रकारे हे राष्ट्र प्रचंड संघर्ष करुन आणि त्याग करुन निर्माण झालेलं आहे.

धार्मिक कट्टरतेल कंटाळून ज्यू महाराष्ट्रात आले

साधारण दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तो काळ ज्यू लोकांसाठी जीवन-मरणाचा काळ होता. त्यांच्या अनन्वित अत्याचार होत होते. लोकांची कत्तल होत होती. असा वेळी आपला राहता प्रदेश सोडून इतर देशांमध्ये आश्रयाला जाणं हेच भाग होतं. मग ते वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रयाला गेले. तसे ते भारतमातेच्या कवेत आले. इतर देशांमध्ये त्यांना तुच्छतेने पाहिलं गेलं. पण आपण हिंदू लोक मुळातंच प्रेमळ आणि उदार. आपण त्यांना आश्रय दिला. भेदभाद केला नाही. तेही आपल्यात मिसळून गेले.

अलिबाग से आये हो क्या?

एखादा मूर्ख माणूस दिसला की सगळे म्हणतात अलिबाग से आये हो क्या? ही म्हण का पडली कुणास ठाऊक. पण ज्यूचं जहाज पहिल्यांदा अलिबागच्या किनार्‍याला लागलं. तिथे झालेल्या अपघातामुळे अनेक ज्यू मेले. काही उरले ते अलिबागचे रहिवासी झाले. अलिबागच्या जवळच्या गावांत ज्यू लोक हळूहळू वाढू लागले. प्रचंड कष्ट घेणारी ही जमात इथे गुण्यागोविंदाने नांदू लागली. अलिबाग से आये हो क्या असं थट्टेने न म्हणता अभिमानाने म्हणावं असं काम त्यांनी करुन दाखवलं.

ज्यू मराठी माणूस

आता इथला ज्यू माणूस हा पूर्णपणे मराठी झाला होता. त्यांनी सुरुवातीला तेल विकण्याचं काम केलं. सर्व प्रकारची कामे त्यांनी केली सुतारकामातही त्यांना हातखंडा होता. मराठी भाषा, खाद्यसंस्कृती इत्यादी गोष्टी मराठमोळ्या झाल्या होत्या. त्यांच्या रुपावरुन आणि बोलण्यावरुन ते ज्यू आहेत असं कुणालही वाटत नाही. त्यांच्या धर्मिक पद्धतीतही मराठी संस्कृतीने शिरकाव केला. मंगळसुत्र घालणे, बांगड्या भरणे इत्यादी गोष्टी ते करु लागले. दुधात साखर विरघळावी तसे ते विरहळून गेले.

ज्यू लोकांनी दंगली घडवून कधीही इथल्या राष्ट्रीय मालमत्तेची हानी केली नाही आणि इथल्या मातीशी गद्दारी तर कधीच केली नाही. त्यांना इस्रायलविषयी जितकं प्रेम आहे तितकंच भारताविषयी देखील आहे. सच्चे देशभक्त आहेत ते. देशाच्या विकासातही त्यांचा मोठा हात आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)

पुण्यामधली इस्रायल आळी

१९१९ मध्ये सिनेगॉग म्हणजे ज्यूंच्या प्रार्थनास्थळाचे बांधकाम सुरु झाले. १९२१ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. काही इतर भागातून तर काही पुण्यात विखुरलेले ज्यू बांधव इथे राहायला आले. हा परिसर पुण्यातला रास्ता पेठेतला. इथे मोठ्या प्रमाणात ज्यू राहू लागल्याने या भागाला ’इस्रायल आळी’ म्हणून ओळख मिलाली. आजंही अनेक ज्यू मराठी लोक इथे राहतात. नवीन पिढी इस्रायला निघून गेली असली तरी जुन्या पिढीला भारत सोडावासा वाटत नाही.

इस्रायलमधले मराठी नागरिक

ज्यावेळी इस्रायल देश निर्माण होऊ लागला. त्यावेळी जगभरात विखुरलेले ज्यू बांधव या देशात जाऊ लागले. त्यांना त्यांची भूमी पुकारत होती. नेक्स्ट इयर इन जेरुसलेम म्हणत पाहिलेलं २००० वर्षांपासूनचं स्वप्न साकार होत होतं. महाराष्ट्रातली अनेक ज्यू मंडळी इस्रायलमध्ये गेली. पण आजंही अनेक ज्यू महाराष्ट्रात राहतात. त्यांचं म्हणणं आहे की ही महाराष्ट्र भूमी देखील आमची मातृभूमी आहे. तिला सोडून कसं जाऊ?

तरी अनेक जण इस्रायला गेल्यामुळे इस्रायलमध्ये मराठी बोलणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की तिथे मराठीचे वर्ग चालतात. मुंबई विद्यापीठाने तेथील मराठीचे वर्ग चालवण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तिथल्या मराठी माणसांना बेणे इस्रायली म्हणतात.

७० हजाराहून अधिक मराठी ज्यू

इस्रालमध्ये ७० हजाराहून अधिक मराठी ज्यू राहतात. पण येणारी पिढी मात्र मराठी भाषिक होत नाही याची चिंता आहे. पूर्वीचे लोक मराठी बोलत आहेत. २०१९ मध्ये इस्रायलमध्ये मराठी भाषेची चळवळ जिवंत ठेवणार्‍या नोहा मस्सील यांनी ही खंत बोलून दाखवली होती. नरेंद्र मोदींमुळे तिथली परिस्थिती बदलत आहे असंही ते म्हणाले होते. इस्रायल आणि भारताची मैत्री वाढत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता तिकडची मराठी चळवळ सर्वांनीच मिळून अधिक बळकट करायची गरज आहे. जेणेकरुन इस्रायलमधून मराठी कधीच हद्दपार होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here