Indian Currency: कागदाशिवाय तयार होतात भारतीय नोटा, या मटेरियलचा होतो वापर!

174

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8.30 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण म्हणजेच नोटाबंदीचा (Monetization of currency) निर्णय जाहीर केला. रात्री 12 नंतर 500 व 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील आणि या नोटा एखाद्या कागदाच्या तुकड्याप्रमाणे राहतील, असं मोदींनी सांगितलं आणि एकच गोंधळ उडाला. पण आपण वापरत असलेल्या नोटा या कागदाशिवाय तयार केल्या जातात हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. नोटांसाठी वापरलं जाणारं मटेरियलच वेगळ आहे.

Features of the new Rs 2000 currency notes

आपल्याला आजवर असं वाटत होतं की नोटा या कागदापासून बनवल्या जातात, पण आपला हा समज खोटा असल्याचं आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कागदापेक्षा अधिक टिकाऊ आणि दिर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू वापरून चलन छापते. भारत आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये चलनी नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो, कारण कापूस हा दीर्घकाळ टिकणारा, हलका आणि छापण्यायोग्य असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार नोटांची छपाई 100 टक्के कापूस वापरून केली जाते.

(हेही वाचा – नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’, खिशातल्या नोटा काढून चेक करा)

यापासून बनविल्या जातात भारतीय नोटा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात. या कापसाच्या नोटा विशेष सूत्राचा वापर करून तयार केल्या जातात, ज्यामध्ये 75 टक्के कापूस आणि 25 टक्के तागाचे मिश्रण असते. छपाई प्रक्रियेदरम्यान, हा कापूस जिलेटिन चिकट द्रावणात मिसळला जातो ज्यामुळे ते जास्त काळ टिकण्यास मदत होते.

rupee 660 250320022436 110520102058 041120033119

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 22 नुसार, भारतात बँक नोट जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युरोपमध्ये चलनी नोटांसाठी कॉम्बर नॉइल कॉटनचा वापर केला जातो. मात्र, चलनी नोटांमध्ये वापरल्या जाणार्‍या कापूस, तागाचे आणि इतर साहित्य आणि त्यांचे प्रमाण नेमके किती असते हे बँकांनी गुप्त ठेवले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.