नेटफ्लिक्स फुकटात वापरणाऱ्यांवर बंधने येणार?

माॅर्निंग कन्सल्ट आणि स्टॅटिस्टाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लोक नेटफ्लिक्सचा वापर फुकटात करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फुकट वापरकर्त्यांवर बंधने घालण्यासाठी नेटफ्लिक्स आता लवकरच काही पावले उचलण्याची शक्यता आहे.

महसूल बुडवला जाताे

कोणाच्याही घरी गेल्यानंतर, त्यांच्याकडून पाहूणचार घेण्यासोबतच त्यांच्या घरातील वायफायचा पासवर्ड विचारला जातो. आता त्याहीपुढे जाऊन पाहुणे नेटफ्लिक्सचे यूजर नेम आणि पासवर्ड मागू लागले आहेत. एकमेकांचे पासवर्ड शेअर केले जातात आणि अर्थातच त्यामुळे महसूल बुडवणारे फुकटे ग्राहक हे नेटफ्लिक्ससकट सगळ्याच ओटीटी कंपन्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरले आहेत.

( हेही वाचा: जंजिरा किल्ल्यावर लवकरच 111 कोटींची उभारली जाणार जेट्टी )

30 टक्के लोक फुकट वापरताहेत नेटफ्लिक्स

आता या फुकट वापरकर्त्यांवर बंधन आणण्यासाठी काय करता येऊ शकेल, यावर वेगवेगळे तांत्रिक उपायही काढले जात आहेत. नेटफ्लिक्सचे सध्या साधारण 22 कोटी ग्राहक आहेत, पण त्याच्या जवळपास निम्मे म्हणजे, 10 कोटी लोक आपली सेवा फुकटात पाहतात, असे कंपनीचे म्हणणे आहे आणि यातले 30 टक्के फुकट लोक अमेरिका -कॅनडात आहेत असाही माॅर्निंग कन्सल्ट या सर्वेक्षण संस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here