अनेकदा डॉक्टरकीची पदवी मिळवल्यानंतर अनुभवासाठी डॉक्टर सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात नोकरी करण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरबरोबरच पगारदार डॉक्टरची संख्याही देशात मोठी आहे. अशावेळी त्यांना नेमका किती पगार मिळतो याचा थोडा आढावा धेऊया. इथं सरासरी पगार गृहित धरला आहे. आणि सध्या मिळत असलेला २०२४ चा पगार विचारात घेतला आहे.
अगदी नवीन नुकताच पदवी घेतलेला डॉक्टर भारतात सरासरी ५.०४ लाख रुपये वार्षिक मिळवतो. तर अनुभवी डॉक्टर जास्तीत जास्त १८ ते २२ लाख रुपये वार्षिक कमावतो. पण, त्यानंतर तो नोकरी करत असलेलं ठिकाण, शहर वा गाव तसंच वैद्यकीय पदवी (एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस इ.) यावरूनही पगारात तफावत आढळते. तसंच तुमची स्नातकोत्तर पदवीही तुम्हाला जास्त पगार मिळवून देऊ शकते.
सरकारी रुग्णालयांमध्ये एमबीबीएस डॉक्टरलाही कमी पगार असतो. एमबीबीएस पदवी घेतलेल्या प्रेशरला सरकारी रुग्णालयांमध्ये २५,००० रुपये मासिक पगार मिळतो. तर खाजगी क्षेत्रात सुरुवातीचा पगार ४०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत जातो. इथपासून सेवा ज्येष्ठतेनुसार हाच पगार वार्षिक ९ लाखांपर्यंत जाऊ शकतो.
स्पेशलायझेशनमध्ये न्यूरोलॉजिस्ट हा सर्वाधिक पगार कमावतो. त्याची सुरुवात ४० हजारांनी सुरू होऊ शकतो. पण, अनुभव आल्यावर तो अगदी २३० लाखांपर्यंतही जाऊ शकतो. तर कार्डिओलॉजिस्ट ९७ लाख वार्षक आणि युरोलॉजिस्ट ९३ लाख वार्षिक पर्यंत कमावतो. सरासरी काढली तर सरकारी रुग्णालयात डॉक्टरटा पगार अनुभव, सेवा ज्येष्ठतेनुसार ४ लाख ते २१ लाख रुपये वार्षिक असा असतो. तोच खाजगी रुग्णालयात पगार १२ ते १८ लाखांच्या दरम्यान असतो.
एमबीबीएस डॉक्टरला सर्वाधिक १२ लाख रुपये पगार असतो. त्यानंतर डेन्टिस्टला वार्षिक ८ लाख रुपये, आयुर्वेद डॉक्टरला ८ लाख रुपये तर एमडी डॉक्टरला २८ लाख रुपये इतका वार्षिक पगार असतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटल या मुंबई स्थित संस्थेत सरासरी १८ लाख रुपये पगार दिला जातो. हा देशात सर्वाधिक आहे. तर एमडी डॉक्टरच्या तुलनेत सर्जनला अधिक पगार असतो.
Join Our WhatsApp Community