महिला रुग्णांना तपासण्याऐवजी त्यांच्या सोबत अश्लील चाळे करीत असल्याचे एका डॉक्टरचे कृत्य व्हिडीओच्या रुपात सर्वांसमोर आले आहे. कांदिवली पश्चिमेतील डॉ. सुधीर शेट्टी या डॉक्टरने एका रुग्ण महिलेला तपासत असताना अश्लील चाळे केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. परंतु हा व्हिडीओ २७ डिसेंबर रोजी समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि डॉक्टरचे कृत्य उघडे पडले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणाची आणखी एक बाजू अशी आहे की, नोव्हेबर महिन्यात या व्हिडीओच्या माध्यमातून डॉक्टरने लाखो रुपयांची खंडणी उकळली होती.
लाखो रुपयांची खंडणी मागितली
पीडित महिला ही कांदिवली पश्चिम चारकोप परिसरात राहणारी आहे. नोव्हेंबर महिन्यात ही महिला डॉक्टर सुधीर शेट्टी यांच्या क्लिनिकमध्ये पाठ दुखीचे कारण घेऊन गेली होती. त्यावेळी डॉक्टरने तिला तपासण्याच्या निमित्ताने तिच्यासोबत अश्लील चाळे केले होते. नेमका हा प्रकार मोबाईल फोन मधील कॅमेऱ्यात टिपण्यात आला. या व्हिडीओच्या माध्यमातून पीडित महिला आणि तिच्या काही सहकाऱ्यांनी डॉक्टरला हा व्हिडीओ दाखवत व्हायरल करण्याची तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी डॉक्टर शेट्टी यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून पीडित महिलेसह चौघांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी दिली.
व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल
दरम्यान सोमवारी हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला, त्यानंतर पीडित महिला चारकोप पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि डॉक्टर विरुद्ध महिलेने तक्रार दाखल केली. डॉक्टर पीडित महिलेला तपासत असतांना व्हिडीओत स्पष्टपणे दिसत असल्यामुळे तसेच त्यातील पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी डॉक्टर सुधीर शेट्टी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community