…तोपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही!

कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितले राज्यात कधी लागणार लॉकडाऊन

81

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये, म्हणून प्रशासन लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्यासंदर्भात भिती सामान्य नागरिकांच्या मनात भिती आहे. यासंदर्भातच महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्स महत्त्वाचं विधान केले आहे.

काय म्हणालं कोविड टास्क फोर्स

महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्सचे सल्लागार सदस्य आणि मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या समन्वय समितीचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, जोपर्यंत राज्यातील परिस्थिती गंभीर होत नाही आणि कोविड-19 चे अनेक गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीत, तोपर्यंत तोपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता नाही. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भन्साळी म्हणाले की, लॉकडाऊन होणार नाही. जेव्हा लोक गंभीर स्थितीत रूग्णालयात येऊ लागतील किंवा दीर्घकाळ रूग्णालयात गंभीर असतील तेव्हाच लॉकडाऊन हा पर्याय असेल.

(हेही वाचा –‘ही’ लक्षणं आहेत तरच गृह विलगीकरणास पालिकेची परवानगी, नवे नियम काय?)

डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, आमच्याकडे खासगी रुग्णालयांमध्ये 7 हजार खाटा आहेत आणि गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवू. तर, 12,000 खाटा लवकरच वाढविल्या जातील. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये 50 टक्के खाटा आहेत. सरकारी आणि बीएमसी संचालित रुग्णालयांमध्ये सुमारे 30 टक्के खाटा ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारपर्यंत, महाराष्ट्रात 26,538 नवीन COVID-19 रूग्ण आणि 8 मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन प्रकरणांपैकी मुंबईत सर्वाधिक 15,166 संक्रमित आहेत.

बहुतेक रुग्ण 2-3 दिवसात बरे होतात

भन्साळी म्हणाले, ‘बहुतेक रूग्ण लक्षणे नसलेले असतात आणि ते 2 ते 3 दिवसांत बरे होतात’ ही समस्या नाही. मुंबईत 40,000 केसेस पाहिल्या तरी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले, ‘प्रकरणांची संख्या वाढत आहे. बुधवारी मुंबईत 15,000 रुग्ण आढळले होते आणि आज ते 20,000 वर पोहोचले आहेत. ते अपेक्षित होते.’

सर्वाधिक रूग्ण मुंबईत 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 67,576,032 रूग्ण नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये 87,505 सक्रिय रूग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे एकूण 144 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 100 रूग्ण मुंबईत आढळून आली आहेत. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 14 रूग्ण, ठाणे आणि पुण्यात प्रत्येकी 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 6  आणि कोल्हापुरात 5 रूग्ण आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.