नोकरीत कायमस्वरपी हुद्दा मिळावा तसेच सातवा वेतन आयोग सुरु व्हावा यासाठी राज्यभरातील २ हजार ७०० वैद्यकीय प्राध्यापकांनी सुरु केलेले बेमुदत आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्वतः वैद्यकीय प्राध्यापक संघटनेशी बैठक घेत प्राध्यापकांचा प्रलंबित मागण्या महिन्याभरात पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले. मात्र महिन्याभरानंतर सकारात्मक बदल दिसून न आल्यास आंदोलन पुन्हा छेडले जाईल, असा इशाराही वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने दिला आहे.
या कारणामुळे होती नाराजी
गेल्या सोमवारपासून राज्यभरातील १९ सरकारी रुग्णालयातील प्राध्यापकांनी बेमुदत आंदोलन सुरु केले होते. केवळ आपत्कालीन रुग्णसेवा दिली जाईल, असे प्राध्यापकांनी जाहीर केले होते. त्यामुळे राज्यभरातील नियोजित शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. नियोजित शस्त्रक्रियांपैकी केवळ १० टक्केच शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णालयात कशाबशा सुरु होत्या. एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या मदतीने बाह्यरुग्ण सेवा सुरु होती. त्याअगोदरही महिनाभर काळ्या फिती लावून प्राध्यापकांनी निषेध मोर्चा सुरु होता. मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट होत नसल्याने प्राध्यापक संघटनेमध्ये नाराजी होती.
अखेर सेवेत रूजू होण्याचा निर्णय
दरम्यान आठवड्याअखेरीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट झाल्यानंतर प्राध्यापकांनी आंदोलन मागे घेत रुग्णसेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
Join Our WhatsApp Community