बेलापूर (वाशी न्यायालय) न्यायालयाने एक संवेदनशील निर्णय दिला. प्राण्यांवर अत्याचार करणे, त्यांना ठार करणे हे सर्रास घडत असते. अशा महाभागांना अद्दल घडेल, अशी शिक्षा न्यायालयाने दिली. त्यामुळे अशा निर्दयी मनाच्या लोकांमध्ये ही शिक्षा भोगताना आपोआपच प्राण्यांप्रती संवेदना निर्माण होईल.
लोखंडी रोडने ठार केलेले
नेरुळ परिसरात २०१५ साली एका कुत्रीला ठार करणाऱ्या दोन महाभागांना बेलापूर न्यायालयाने १ महिना प्राणी मित्र संघटनेसोबत विनावेतन कुत्र्यांची सेवा करण्याची शिक्षा दिली. नवी मुंबईतील प्राणी सुरक्षा विभागाच्या आणि प्राणी मित्र कार्यकर्त्या आरती चौहान यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. नेरुळ येथील सफल कॉम्प्लेक्स बाहेर या दोन महाभागांनी ११ सप्टेंबर २०१५ रोजी एका कुत्रीला लोखंडी रोडने मारून तिला ठार केले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून न्यायालयात पुरावे सादर केले होते.
(हेही वाचा 26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकले?)
न्यायालयाने काय दिला आदेश?
याप्रकरणी न्यायधीश टी.एम. देशमुख-नाईक यांनी अंतिम निर्णय दिला. यावेळी आरोपी राम कुजबिहारी आणि अखिलेश अस्थाना यांना एक महिना प्राणी मित्र संस्थेत एक महिना विना वेतन काम करावे, तिथे कुत्रे, मांजरे यांची सेवा करावी. तसेच प्रत्येकाने २० हजार रुपये दंड भरावा, असा आदेश दिला.
Join Our WhatsApp Community