डोलाराय मांकड (Dolarai Mankad) हे गुजराती साहित्यातलं प्रचंड मोठं नाव. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९०२ रोजी कच्छ येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सौराष्ट्रात झाल्र. त्यानंतर ते कराचीला गेले. तिथे ते भारत सरस्वती मंदिरात १९२३-२५ मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते पुन्हा २ वर्षांच्या कालावधीसाठी त्याच संस्थेचे मुख्याध्यापक झाले.
(हेही वाचा – Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा)
१९६४ चा साहित्य अकादमी पुरस्कार
डोलाराय मांकड यांचे पूर्ण नाव डोलराय रंगीलदास मांकड असे आहे. ते एक गुजराती समीक्षक, संशोधक आणि कवी होते. त्यांना त्यांच्या गुजराती भाषेतील ’नैवेद्य’ या निबंधासाठी १९६४ चा साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award) मिळाला होता. ते सौराष्ट्र विद्यापीठाचे (Saurashtra University) पहिले कुलगुरू होते. १९२७ मध्ये ते डी.जे. सायन्स कॉलेजमध्ये (D.J. College of Science) गुजराती भाषा आणि संस्कृतचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भारताच्या फाळणीपर्यंत ते या पदावर विराजमान होते.
(हेही वाचा – Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, अनेक जण अडकल्याची भीती)
सौराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
फाळणीनंतर ते भारतात आले आणि २ वर्षांसाठी विठ्ठलभाई पटेल विद्यापीठाचे प्राचार्य झाले. त्यानंतर पुढील ७ वर्षे ते गोपालदास विद्यापीठात (Gopaldas University) प्राचार्य म्हणून काम करु लागले. त्यानंतर ते हरिभाई संशोधन केंद्राचे संचालक झाले. मग पुढे ते सौराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनले आणि अखेरपर्यंत ते या पदावर विराजमान होते. (Dolarai Mankad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community