Dombivali Bank Robbery: बॅंक कर्मचा-यानेच लुटली बॅंक; सिनेस्टाईलने केली चोरी

आय.सी.आय.सी.आय बॅंकेच्या ( ICICI Bank robbery Dombivali) शाखेतून तब्बल 12 कोटी 20 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. चोरीचे कोट्यावधी रुपये चोराने आठवडाभर मुंब्रा परिसरात टेम्पोत लपवून ठेवले. या चोरीप्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे पोलिसांनी चौघांपैकी तिघांना मुंब्रा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. टेम्पोमधून 5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरातील आय.सी.आय.सी.आय बॅंकेच्या शाखेतून तब्बल 12 कोटी 20 लाख रुपयांची रोकड चोरणा-या चौघांपैकी तिघांना ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा तपासल्याने, चोरी उघड

9 व 10 तारखेला बॅंकेला सुट्टी होती. 11 जुलैला, या बॅंकेमधील सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचे, बॅंकेच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित बॅंक प्रशासनाने टेक्निकल टीमला संपर्क साधून त्यांना दुरुस्तीसाठी बोलावले. दुस-या दिवशी म्हणजेच 12 तारखेला त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले त्यावेळी यातील काही फुटेज डिलीट असल्याचे आढळले.

( हेही वाचा: शिवसेना फोडणे आणि फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे, यातच मुख्यमंत्री मश्गुल; सामना अग्रलेखातून टीका )

मुख्य आरोपी फरार 

त्यानंतर बॅंकेच्या कर्मचा-यांनी पैसे ठेवण्याची जागा तपासली असता, त्यातली 34 कोटी रुपये गायब होते. हा सर्व प्रकार पाहून बॅंकेच्या कर्मचा-यांना धक्का बसला. कार्यालय तपासले असता, सुरक्षा रक्षकाला पैशांनी भरलेल्या काही बॅग्स आढळून आल्या. या बॅग्समध्ये 34 कोटींपैकी 22 कोटी रुपये आढळून आले. तसेच, या पैशांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला कर्मचारी अल्ताफ शेख हा देखील गायब होता. या चोरीमागचा मुख्य आरोपी अल्ताफ असून, तो सध्या फरार आहे. उर्वरीत रक्कम त्याच्याकडे असू शकते, अशा संशय पोलिसांना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here