डोंबिवली पूर्व एम.आय.डी.सी लगत असलेल्या खंबालपाडा परिसरात मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी याच परिसरातील नाल्यातून येत होती. नाल्यात केमिकल ओतल्याने ही दुर्गंधी पसरली असल्याचे समजत आहे.
खंबालपाडा परिसरात परसली अचानक दुर्गंधी
याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार केली असता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. एम आय डी सी परिसरातील नाले चेंबरची पाहणी केली. मात्र, काही आढळून आले नाही. मात्र, एम आय डी सी लगत असलेल्या खंबालपाडा परिसरात असलेल्या निर्माणाधिन इमारतीच्या आत असलेल्या नाल्यात केमिकलचे ड्रम ओतले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असून, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
( हेही वाचा: ‘हलाल’ अन्नपदार्थ बंद करा, अन्यथा ‘झटका’ देऊ…; मनसेचा मॅकडोनाल्ड्सला इशारा )
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उग्र दर्प पसरला
डोंबिवली एमआयडीसी परिसरात केमिकलची दुर्गंधी, त्यामुळे होणारे प्रदूषण ही नवीन समस्या नाही. मात्र, या आसपासच्या परिसरातदेखील या केमिकलमुळे होणा-या प्रदूषणाचा त्रास जाणवू लागला आहे. अनेकदा, एम आय डी सी परिसरातील नाल्यात अज्ञातांकडून केमिकल सोडण्यात येत असल्याने, या परिसरात दुर्गंधी पसरल्याच्या तक्रारी याआधीदेखील करण्यात आल्या होत्या. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेत ठोस उपाययोजना सुरु केल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसी लगत असलेल्या खंबालपाडा या परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उग्र दर्प पसरला होता. या परिसरातून वाहणा-या नाल्याचे पाणी पांढ-या रंगाचे झाले होते.
Join Our WhatsApp Community