दाऊद इब्राहिम दोन वर्षांत राज्यात झाला सक्रिय! काय आहे कारण?

104

केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आलेल्या डी कंपनीचा सर्वेसर्वा डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीतून डी कंपनीची सूत्रे हलवत आहे. मागील दोन वर्षात दाऊद पुन्हा एकदा बेकायदेशीर धंद्यात उतरला असून त्याचे काही हस्तक मुंबईतून ड्रग्स, रियल इस्टेट, हवाला रॅकेट आणि बेकायदेशीररित्या सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. राज्यात सत्ता बदलानंतर दाऊदच्या कारवायांची गती वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ईडीची छापेमारी 

या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए ने डी कंपनीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान ईडीने नुकताच डी- कंपनीवर मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल करून छापेमारी करण्यात आली. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या घरासह १० ठिकाणी केलेल्या छापेमारीत ईडीच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद मागील दोन वर्षापासून बेकायदेशीर धंद्यात सक्रिय झाला आहे.

( हेही वाचा : डी कंपनीला ईडीचा दुसरा धक्का, इकबाल कासकरचा घेणार ताबा )

दाऊद पुन्हा एकदा बेकायदेशीर धंद्यात सक्रिय

दाऊद याने त्याच्या हस्तकाच्या आणि निकटवर्तीयाच्या माध्यमातून मोठी संपत्ती उभी केली आहे, दाऊद गुन्हेगारी जगतात अजून देखील सक्रिय आहे, त्याचे हस्तक आजही त्याच्यासाठी काम करतात, हवाला रॅकेटच्या माध्यमातून दाऊद आजही पाकिस्तानमधून डी कंपनी ऑपरेट करीत असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. दाऊदचे ४ ते ५ हस्तक मुंबईतून हवाला रॅकेट आणि बेकायदेशीर बेटिंग चालवत आहे. त्यातून येणारा पैसा हवाला रॅकेट मार्फत डी कंपनीला पोहचवला जात असल्याची माहिती हाती लागली असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. हे हस्तक मुंबईतील रियल इस्टेट आणि हवाला रॅकेट ऑपरेट करीत असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणेच्या हाती लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.