Twitter वर डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा वापसी! एलॉन मस्कच्या सर्वेक्षणानंतर निर्णय

150

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रक्षोभक ट्विटमुळे जानेवारी २०२१ मध्ये ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती. मात्र ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क झाल्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यास सुरूवात केली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवरील अकाऊंट रिस्टोअर करण्यात येणार की नाही? याबद्दल चर्चा सुरू होती. यानंतर मस्क यांनी एक सर्वेक्षण सुरू केले होते, ज्यामध्ये ते ट्विटर यूजर्सना विचारत होते की, ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करावे की नाही? मात्र ट्विटरवर ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा दिसून आले आहे.

(हेही वाचा – Zomato Layoff: आता झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांवरही नोकरीची टांगती तलवार, अशी आहे कंपनीची योजना)

एलॉन मस्ककडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत ट्विटर प्लॅटफॉर्मवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते रिस्टोअर करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यासाठी त्यांनी शनिवारपासून मतदानालाही सुरुवात केली. मात्र रविवारी मतदान संपल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याचे दिसले. मात्र बहुमत मिळाल्यानंतरही आता ट्विटरवर परतण्यात रस नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले. एलॉन मस्क यांनी 19 नोव्हेंबर रोजी युजर्सना विचारले होते की, ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करावे की नाही. यावर, 51.8 टक्के युजर्सनी खाते पुनर्संचयित करण्याच्या बाजूने मतदान केले. या मतदानात एकूण 1,50,85,458 लोकांनी भाग घेतला.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले असून एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. ट्विटरवरील लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सांगितले होते की, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट लवकरच रिस्टोअर केले जाईल. गेल्या वर्षी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटल हिलमध्ये दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घालण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.