नोकरी गेली तरी नो टेन्शन! तुमच्याकडे ‘हा’ विमा आहे ना?

106

सध्या जगभरात मंदी आणि विक्री कमी झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. ट्विटर, मेटा, गुगल, अॅमेझॉनसह जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही नोकरीच्या सुरक्षिततेची काळजी असेल. नोकरी गेली तरी घर चालवण्यासह कर्जाचा हफ्ता भरणे खूप कठीण होते. अशा संकटावर मात करण्यासाठी नोकरी विमा (जॉब इन्शुरन्स) खरेदी करू शकतात. त्यामुळे तुमची नोकरी गेली तरी नो टेन्शन!

जॉब इन्शुरन्स म्हणजे…

विमा कंपन्या ही पॉलिसी नोकरदार लोकांना देतात. ही पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाने आपली नोकरी गमावल्यास, विमा कंपनी अटींनुसार त्याचे सर्व ईएमआय भरते. मात्र भारतात स्वतंत्र पॉलिसी म्हणून नोकरी विमा उपलब्ध नाही. हा विमा मुख्य पॉलिसीसह रायडर किंवा अॅड ऑन कव्हर म्हणून उपलब्ध आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराचे उत्पन्न पगाराच्या स्वरूपात असले पाहिजे.

(हेही वाचा – करा हो ‘लगीन घाई’… 2023 नवं वर्षातील जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् तिथी)

नोकरी विमा म्हणजे जॉब इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम सामान्यतः एकूण कव्हरेजच्या ३ टक्के ते ५ टक्के पर्यंत असतो. जर गृहकर्जांतर्गत नोकरी विमा पॉलिसी घेतली असेल तर त्याचा कालवधी पाच वर्षांचा असेल. जॉब लॉस इन्शुरन्स अत्यंत मर्यादित पद्धतीने फायदे देते. अनेक कंपन्या निव्वळ उत्पन्नाच्या केवळ ५० टक्केच रक्कम देतात. जॉब इन्शुरन्स अंतर्गत कंपन्या खूप कमी कालावधीसाठी विमा संरक्षण देतात.

दरम्यान, यामध्ये आरोग्य विमा पॉलिसीप्रमाणे, प्रतीक्षा कालावधी ३० ते ९० दिवस किंवा जास्तीत जास्त चार महिने असतो. त्याप्रमाणे पॉलिसीची मुदतदेखील एक ते पाच वर्षांपर्यंत बदलते. इतकेच नाही तर कंपनी योजनेंतर्गत तुमचे तीन ते चार ईएमआय भरत, त्याआधी तुम्हाला स्वतःसाठी नवी नोकरी शोधावी लागते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.