शुक्रवारी, ६ मे रोजी सकाळी ६.२५ वाजता बाबा केदार धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आल्याने संपूर्ण केदारनगरी हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेली. १२ ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे कवाडं आजपासून उघडली असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते आणि त्यांनीही केदार धामच्या उद्घाटनाची माहिती त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली. परंपरेनुसार धाम उघडल्यानंतर धाममध्ये पूजेची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी केदारधाम येथे हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहे.
(हेही वाचा – मुंबईकरांनो टॅक्सीने प्रवास करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची)
LIVE : श्री केदारनाथ धाम के कपाट खुलने के शुभ अवसर पर पूजा-अर्चना https://t.co/AEMBJBke2a
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) May 6, 2022
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
सहा महिन्यनंतर उघडलेल्या केदारनाथ मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी साधारण 10 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. देश-विदेशातून हजारो भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. थंडी असूनही बाबांचे दरवाजे उघडण्यापूर्वीच गुरुवारी रात्री उशिरापासून केदार मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. तर सकाळीच बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह भाविकांकडून आवरला नाही.
यात्रेकरूंच्या संख्येची मर्यादा निश्चित
गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीचे थैमान देशभरात झाल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन होता. त्यामुळे केदारनाथ येथे भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देखील नव्हती. दरवर्षी केदारनाथ धाम येथे दरवाजे उघडून बाबांची पूजा केली जाते. परंतु, यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने भाविकांना दर्शन घेता येणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तराखंड सरकारने कोरोनामुळे चार धाम यात्रा २०२२ साठी यात्रेकरूंच्या संख्येची मर्यादा निश्चित केली आहे. केदारनाथ मंदिरासाठी दैनिक मर्यादा १२ हजार आणि बद्रीनाथसाठी १५ हजार तर गंगोत्री धामसाठी दैनंदिन मर्यादा ४७ हजार आणि यमुनोत्री धाम ४ हजार ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे भाविकांची संख्या ठरवून दिली असली तरी चारधाम यात्रेसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य नाही, असेही धामी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
Join Our WhatsApp Community