प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. गाड्यांच्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या परिस्थितीतही सुधारणा करण्यात येत आहे, जेणेकरून विलंबाला सामोरे जावे लागणार नाही. स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. याशिवाय गाड्यांचा सरासरी वेग वाढवण्यासाठी रुळांची दुरुस्ती आणि रेल्वेच्या बोगींमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. (Doronto Express)
दुरंतो एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ह्या गाड्यांचे वैशिष्ट्य असे होते की त्या सुरुवातीच्या स्थानकापासून ते शेवटपर्यंत विनाथांबा धावत होत्या. त्यांचे थांबे केवळ तांत्रिक कारणांसाठी किंवा चमू बदलण्यासाठी होते. थांबे नसल्यामुळे दुरंतो एक्सप्रेस गाडी सध्या भारतामधील सर्वात वेगवान रेल्वे आहे. बरेचदा त्यांचा सरासरी वेग राजधानी अथवा शताब्दी गाड्यांपेक्षा देखील अधिक असतो. ब-याच दुरांतो गाड्या पूर्णपणे वातानुकुलीत असून त्यांचे डबे बाहेरून पिवळ्या-हिरव्या र्ंगाच्या नक्षीने रंगवले असतात. प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते. (Doronto Express)
सध्या देशभरात दुरांतो एक्स्प्रेसच्या २६ जोड्या म्हणजेच (५२ गाड्या) धावत आहेत. या गाड्यांना खूप कमी थांबे आहेत आणि त्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. लांब पल्ल्याच्या ट्रेन असल्याने ट्रेनमध्येच प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था असते. सर्व दुरांतो एक्सप्रेस गाड्यांचे डबे इतर गाड्यांपेक्षा वेगळे करण्यासाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगात रंगवले जातात. (Doronto Express)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community