शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’! निर्देशांकात 1000 अंकांची मोठी घसरण

बीएसई सोबतच निफ्टीवरही झाला परिणाम

183

जागतिक शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवर देखील दिसून आला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (बीएसई) 1000 अंक आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (निफ्टी) 300 अंकांची घसरण दिसून आली.

(हेही वाचा – गणेशोत्सवात लाऊड स्पीकर लावताय? जरा जपून! …नाहीतर होणार कारवाई)

शेवटच्या काही तासांत मोठी घसरण

अमेरिकन शेअर बाजारात शुक्रवारी शेवटच्या काही तासांत मोठी घसरण झाली होती. महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर बाजार बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासात अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामुळे अमेरिकेत मोठी घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला . प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57,753.61 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 314 अंकांच्या घसरणीसह 17,244.45 अंकांवर व्यवहार करत होता.

बीएसईसह निफ्टीवरही परिणाम

निफ्टीतील स्मॉलकॅप 100, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रियल्टी या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकात 4.20 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, पीएसयू बँक निर्देशांकात 2.51 टक्के आणि मेटलमध्ये 2.44 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टीतही दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.