घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणांचे संकलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेख आणि भाषणे या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुस्तकात बहिष्कृत भारत या आंबेडकरांच्या नियतकालिकातील भाषणांचा समावेश आहे. 2002 साली सरकारच्या अखत्यारितील डॉ.आंबेडकर समग्र वाङ्मय संपादन मंडळाकडून हे पुस्तक छापण्यात आले आहे.
3 मे 1929 रोजी बहिष्कृत भारतमध्ये छापून आलेल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जानव्याचे महत्व पटवून दिले आहे. पण हा उल्लेख डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेख आणि भाषणे खंड-18 भाग 1 या पुस्तकातून वगळण्यात आल्याचा खुलासा इतिहास अभ्यासक मधुसूदन चेरेकर यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
(हेही वाचाः ‘24 तासांत ट्वीट डिलीट करा’, स्मृती इराणींच्या मुलीवर आरोप करणा-या काँग्रेस नेत्यांना न्यायालयाने फटकारले)
बाबासाहेबांनी सांगितले होते जानव्याचे महत्व
13 एप्रिल 1929 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात सहा हजार अस्पृश्य बांधवांना जानवी वाटप करुन श्रावणी समारंभ साजरा केला. यावेळी केलेल्या भाषणात आंबेडकरांनी जानव्याचे महत्व सांगितले होते.
‘आपण क्षत्रीय आहोत ही जाणीव आपल्याला जानवी घेऊन होईल. कोणतीही दीक्षा घेतल्यावर काहीतरी बंधन राहते. जानवे हा मनाचा बाणा आहे. हा बाणा जागृत करण्यासाठी आम्ही तुम्हाला आता जानवी देणार आहोत. ही जानवी जो कोणी मेलेल्या जनावराचे मांस व गोमांस खाणार नाही अशी शपथ घेईल त्यांनाच देण्यात येतील. जो कोणी तप करणार नाही त्याला फळ मिळणार नाही.’,
अशा शब्दांत आंबेडकरांनी जानव्याचे महत्व पटवून देत भाषणाचा समारोप केला होता. 3 मे 1929 रोजी बहिष्कृत भारत या नियतकालिकात हे भाषण प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(हेही वाचाः ‘मी राजीनामा द्यायला तयार’, शिंदे गटातील आमदाराने स्वीकारले ठाकरेंचे चॅलेंज)
मजकूर वगळला
पण, 2002 साली प्रकाशित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे खंड 1 मध्ये भाषणातील हा समारोपाचा मजकूर वगळण्यात आल्याचे आता समोर येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे- खंड 1 या प्रदीप गायकवाड यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे संपूर्ण भाषण समारोपाच्या मजकूरासहित प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यामुळे डॉ.आंबेडकर समग्र वाङ्मय संपादन मंडळावर 2002 साली नियुक्ती करण्यात आलेल्या प्राध्यापक हरी नरके आणि इतर संपादकांकडून हा मजकूर वगळण्यात आल्याचे समोर येत आहे. आपल्याला न रुचणारे विचार गाळण्याचा अधिकार संपादकांना आहे काय?, असा थेट सवालही मधुसूदन चेरेकर यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community