जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठातापदी डॉ. पल्लवी सापळे यांची २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाटेत त्यांना प्रथम सांगली-मिरज आणि नंतर धुळे येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा डॉ. पल्लवी सापळे यांनी २९ मार्च २०२२ रोजी जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
कार्यभार स्वीकारला
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठातापद भूषणवण्याची संधी अनेक वर्षांनी डॉ. पल्लवी यांच्या रूपाने महिला डॉक्टरला मिळाली होती. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत त्यांना २७ मार्च २०२० पासून सांगली- मिरज व त्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. त्यावेळी डॉ. रणजित माणकेश्वर यांच्याकडे जे. जे. रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठातापदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. आता मात्र जवळपास दोन वर्षांनी डॉ. पल्लवी सापळे यांची धुळ्यातील प्रतिनियुक्ती रद्द झाली असून त्यांनी पुन्हा जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचारी अद्याप कोविड भत्त्यापासून वंचित! )
डॉ. पल्लवी सापळे या जे. जे. रुग्णालयाच्या विद्यार्थिनी आहेत. तसेच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर कामा आणि जे. जे. रुग्णालयामध्ये रुग्णसेवाही केली आहे. कामा व जे. जे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये बालरोग विभागप्रमुख, प्राध्यापक अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
Join Our WhatsApp Community