अमरावतीत जनावरांना चुकीची लस देणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरचे निलंबन

129

अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली आहे. राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी. तसेच लम्पी लस आपल्या जनावरांना टोचून घ्यावी असे आवाहन राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. परंतु अर्धवट ज्ञान असलेले पशुवैद्यकीय डॉ. सातव पशुसंवर्धन अधिकारी टाकरखेडा पूर्णा यांनी लम्पी लसीऐवजी ब्रूसीलॉसिसची लस जनावरांना टोचली. यामुळे अनेक जनावरे मृत्यूच्या दारात उभे असल्याची बातमी समोर येताच जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग झोपेतून जागा झाला आणि बुधवारी त्या डॉक्टरच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

(हेही वाचा – BCCI बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! सौरव गांगुलीसह जय शाह पदावर राहणार कायम)

काय घडला प्रकार

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा या गावात लम्पी आजाराचे मोठे संकट जनावरांवर आलेले आहे. या बाधित जनावरांना लस देण्यासाठी गावात लसीकरणाचा कॅम्प डॉ. सातव यांनी आयोजित केला होता. त्यांनी सर्व पशुपालक यांना आपल्याकडे लस उपलब्ध झाल्याची माहितीही दिली. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी आपआपली जनावरे लसीकरणाच्या कॅम्प ठिकाणी आणून एकत्र केली व लसीकरणला सुरुवात झाली. मात्र डॉ सातव यांनी लम्पी लसीऐवजी ब्रूसीलॉसिसची लस टोचली. यानंतर काही वेळातच अनेक जनावरे अस्वस्थ झाल्याचे समोर आले.

या सर्व जनावरांनी चारा,पाणी पिणे सोडून दिले आहे. ही लस दिल्यामुळे अनेक गायी व बैलाच्या मानेवर गाठी आल्या आहेत. डॉ. सातव यांनी ब्रूसीलॉसिसची लस लम्पीच्या नावाखाली दिली. ती लस केवळ लस ९ महिन्यांच्या आतील कालोडींना प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच देण्यात येते. त्याशिवाय ही लस जनावरांना देता येत नाही, मात्र डॉ. सातव यांनी कोणताही विचार न करता तब्बल दीडशे जनावरांना ही लस टोचली आहे. त्यामुळे अशा बेजवाबदार डॉ. सातव यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.

ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच पंचनामा करून खातरजमा केली. ही बाब सत्य आढळून ती प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सातव यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.