मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी ५ जून २०२३ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. सुधाकर शिंदे यांचे स्वागत केले.
डॉ. शिंदे यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविदयालयातून एमबीबीएस पदवी संपादीत केली. तसेच, औषधनिर्माणशास्त्रामध्ये त्यांनी संशोधन केले आहे. त्यानंतर भारतीय राजस्व सेवेत (I.R.S.) त्यांनी २००७ मध्ये प्रवेश केला.
राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटी अंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने जबाबदारी सांभाळताना कोविड संसर्ग कालावधीत डॉ. शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः कोविड चाचण्यांची दर निश्चिती, मास्क व निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) यांची दर निश्चिती, खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दराने कोविड रुग्णांवर उपचार करणे, जादा देयक आकारणाऱ्या रुग्णालयांचे नियमन करुन तक्रारींचे निराकरण व रुग्णांना परतावा मिळवून देणे या सर्व बाबींची त्यांनी शासन निर्णय स्वरुपात केलेली अंमलबजावणी अतिशय परिणामकारक ठरली. त्याचप्रमाणे, पनवेल महानगरपालिका आयुक्त म्हणून कामकाज सांभाळतानाही त्यांनी विशेष ठसा उमटविला आहे.
(हेही वाचा Game Jihad : मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू मुलांचे होतेय धर्मांतर; आरोपी शाहनवाज कुटुंबासह फरार)
Join Our WhatsApp Community