अविश्वसनीय! मंगळुरु येथे डॉ. यशस्वी नारवी यांनी कोब्रा सापावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

265
अविश्वसनीय! मंगळुरु येथे डॉ. यशस्वी नारवी यांनी कोब्रा सापावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

मनुष्याने आपल्या आपल्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी जंगलतोड करून शहरे वाढवली. जंगलतोड केल्यामुळे कित्येक जंगली प्राण्यांना आपला निवारा गमवावा लागतो आणि ते प्राणी कधीतरी या काँक्रीटच्या जंगलात म्हणजेच शहरात प्रवेश करताना दिसतात. एवढेच नव्हे तर प्लॅस्टिकसारखा पदार्थ जो पर्यावरणासाठी एवढा घातक आहे त्याचा वापरही सर्रास सुरू आहे. काँक्रीटच्या जंगलामध्ये हिरवागार निसर्ग अनुभवता येत नाही म्हणून कितीतरी लोक जंगलात फिरायला जातात.

माणसे स्वतः सोबत शहरातला कचरा जंगलात घेऊन जातात आणि तो तिथे तसाच फेकून देतात. हा कचरा जंगलातल्या प्राण्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्लास्टिकने पर्यावरण बिघडते आणि जंगली प्राण्यांना याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो, हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे. अशीच एक घटना घडली आहे मंगळुरू येथे. किंग कोब्रा जातीच्या सापाने एक प्लास्टिकचा कॅन गिळल्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याचा जीव वाचवला. असा व्हिडीओ एका प्राणीमित्र संस्थेने शेअर केला आहे.

हल्ली ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, एका सापाचे ऑपरेशन करून त्याच्या पोटातला प्लास्टिकचा कॅन काढून टाकला. हे दृश्य बघून माणसं किती स्वार्थी होत चालली आहेत याचा प्रत्यय येतो. पण दुसरी बाजू पाहिली तर आपल्याला असे लक्षात येते की, काही माणसे कितीही स्वार्थीपणे वागली तरी अजूनही जगभरात अनेक प्राणीमित्र संस्था आहे ज्या आपले काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत.

अशाच एका संस्थेने ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. ही घटना मंगळुरू येथे घडली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, एक डॉक्टर किंग कोब्रा जातीच्या सापाला तपासत आहेत. ते त्याचे पोट दाबून तो प्लास्टिकचा कॅन कुठे आहे याचा अंदाज घेतात. तेव्हा त्यांना तो कॅन सापडतो. वेळ न दवडता ऑपरेशनची तयारी केली जाते आणि बऱ्याच कालावधीनंतर हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडते. किंग कोब्रा जातीच्या सापाच्या पोटातून प्लास्टिकचा कॅन बाहेर काढून त्या प्राण्याचा जीव डॉक्टरांनी वाचवला. हे खरंच कौतुकास्पद आहे.

ट्विटरवर या व्हिडिओला खूप लाईक्स मिळत आहेत. त्यासोबतच लोक या संस्थेचे कौतुक करत आहेत. माणुसकी वाचवणारे खरे हिरो म्हणून या संस्थेला संबोधले जाते आहे.

 

(हेही वाचा – भारताला २०४७ पर्यंत विकसीत राष्ट्र बनवणार – पंतप्रधान मोदी)

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.