संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालक पदावर काम करत असलेल्या प्रदीप कारुळकर यांना दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत अटक केली आहे. डीआरडीओचे संचालक हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता दहशतवादी विरोधी पथकाने संचालकवर मोठी कारवाई केली आहे.
(हेही वाचा – The Kerala Story : ‘अल्लाह-हू-अकबर, नारा-ए-तकबीर’ घोषणा देत फाडले ‘द केरळ स्टोरी’चे पोस्टर)
अशातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटल्याची माहिती ‘एटीएस’ला मिळाली आहे. त्यामुळे कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविल्यानंतर त्यांच्या परदेशात भेटी कशा आणि केव्हा झाल्या, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही पहा –
निवृत्तीला सहा महिने राहिले (DRDO) असताना ते हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएसने त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Join Our WhatsApp Community