‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ करणं पडलं महागात; मुंबई पोलिसांकडून 156 जणांवर कारवाई

157

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या 156 लोकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दारु प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त

नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, रेस्टोरंट्स, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्धवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. अनेक ठिकाणचे मार्ग बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले होते.

( हेही वाचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; LPG गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर )

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

रॅश ड्रायव्हिंगपासून ते दारुड्यांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा याआधीदेखील मुंबई पोलिसांनी दिला होता. आता त्यानुसार, मुंबईत 156 जणांवर मद्य प्राशन करुन वाहन चालवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. तर, अतिवेगाने वाहने चालवणा-या 66 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर ‘कल्पक मोहीम’ राबवली. वेगवेगळ्या पोस्ट, ट्वीटच्या माध्यमातून पोलिसांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नका, असे आवाहन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.