पन्हाळगडावर पर्यटकांची दारू पार्टी, शिवप्रेमींचा राग अनावर

81

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगड किल्यावर पर्यटकांनी केलेली दारू पार्टी समोर आली आहे. या संतापजनक प्रकारामुळे राज्यातील शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत. पर्यटकांकडून दारूची पार्टी होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. असे सांगितले जात आहे की, पर्यटकांसाठी जेवणासाठी असलेल्या झुणका भाकर केंद्रात ही दारू पार्टी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा पार्ट्यांकडे पोलीस व पुरातत्व विभाग लक्ष का देत नाही, असा सवाल उपस्थित करून शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहे. इतकेच नाही तर शिवप्रेमींनी अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: आता दिवस-रात्र ‘तिरंगा’ फडकणार! ध्वज संहितेत मोठा बदल)

दरम्यान, पार्टी करणाऱ्यांवर शिवप्रेमींकडून कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे झुणका भाकर केंद्राकडून या पार्ट्यांसाठी विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे. त्यामुळे या झुणका भाकर केंद्रावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पन्हाळगडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या गडावर अनधिकृतपणे सर्रास दारू पार्ट्या होताना पाहायला मिळत आहे.

शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकलेल्या महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. परंतु असे असतानाही पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने शिवभक्त नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूज ढासळला होता. तर गेल्यावर्षी देखील त्या ठिकाणी बुरूज ढासळण्याची घटना घडली होती, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.