मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; 80 कोटी किंमतीचे 16 किलो ड्रग्ज जप्त

146

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली. बिनू जाॅन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचा नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. त्याच्याकडून मुंबई DRI पथकाने 16 किलो हेराॅईन ताब्यात घेतले आहे.

आरोपीने ट्राॅली बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमध्ये ड्रग्ज लपवले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने 16 किलो उच्चप्रतिचे हेराॅईन जप्त केले. हस्तगत केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 80 कोटी रुपये असल्याचे म्हटेल जात आहे.

( हेही वाचा: अडीच वर्षांत केवळ अडीच तास मंत्रालयात गेले; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका )

आरोपी अटकेत

DRI ला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाचे पथक विमानतळावर पोहोचले. आरोपी विमानतळावर पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झाडाझडती केली. त्याच्याकडील वस्तूंचीही तपासणी केली पण त्यात काही सापडले नाही. पण त्याची ट्राॅली बॅग तपासली असता, या बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमधून ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर डीआरआयने NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.