गुरुवारी सकाळी मुंबई व नजीकच्या परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली. मुंबईत कुलाबा, सांताक्रूझ, कांदिवली ते विरार आणि पनवेलमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली होती. याबाबत अनभिज्ञ राहिलेल्या मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने सकाळच्या सुधारित अंदाजपत्रात मुंबईत दिवसभर हलका शिडकावा राहिल, असा अंदाज जाहीर केला. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडातही होईल, असेही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले.
( हेही वाचा : वाहतूक नियम मोडाल तर याद राखा, मिळणार ही अजब शिक्षा )
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज
याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने बुधवारपर्यंत कोणताच अंदाज वर्तवला नव्हता. बुधवारी सायंकाळीही केवळ वातावरण ढगाळ राहील, एवढाच अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्यावतीने वर्तवण्यात आला होता. काही खासगी अभ्यासकांनी मुंबई व नजीकच्या भागांत गुरुवारी पावसाचा शिडकावा राहिल, असा अंदाज जाहीर केला होता. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्याऐवजी खासगी अभ्यासकांच्या अंदाजाला वरुणराजाने कौल दिला. हा पावसाचा शिडकावा सकाळी आठ ते सकाळी दहाच्या सुमासास काही मिनिटांसाठी झाला. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रातही पावसाची नोंद होण्याइतपत पाऊस झाला नाही, अशी माहिती दिली गेली. गुरुवारी किमान तापमान २६.१ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्यावतीने दिला गेला.
Join Our WhatsApp Community