मुंबईसह महाराष्ट्रावर होणार हल्ला? यंत्रणांच्या हाती लागलं संभाषण

मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ला करण्याचा कट रचत असल्याचं संभाषण सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस आणि यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रजासत्ताक दिन आठवड्यावर आला आहे, त्यातच आता मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्लाचा कट रचला जात आहे. त्यामुळे मुंबईसह सर्व प्रमुख शहरे अलर्टवर आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असं काही घडलं तर आपल्याकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही बाब मान्य केली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या हाती संभाषण

जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत कायम बोललं जातं. मात्र, आता संरक्षण यंत्रणांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण पकडलं आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, भविष्यात असं काही घडलं तर महाराष्ट्रात अँटीड्रोन सिस्टमसुद्धा उपलब्ध नाही आहे.

( हेही वाचा: गौहर खानचा समान नागरी संहिता कायद्याला विरोध, म्हणते ‘अरे लूजर! मी मुस्लिम आहे…’)

ड्रोन हल्ला धोकादायक

ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरुनही निशाणा साधला जाऊ शकतो. ड्रोनवर पेलोड बसवता येतात. याशिवाय, त्यांना बॅकट्रॅक करणे सोपे नाही. गुन्हेगाराने मोबाईल फोन वापरला, तर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरुन शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोन मागे टाकून गुन्हेगाराचा शोध लावता येत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी, अशी मागणी केली जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here