जम्मू काश्मिरमधील वेगवेगळ्या परिसरात दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरएसपुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कुरापती केल्या आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरएसपुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोनद्वारे टाकलेल्या शस्त्रात्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली असून या परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली आहे.
(हेही वाचा – तुम्ही ऑनलाईन वीज बिल भरता? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा…)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे बासपूर बंगला परिसरात ड्रोनच्या हालचालीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून चंद्र बोस आणि समशेर सिंग या दोघांना पोलिसांना ताब्यात घेऊन त्यांना बेड्या ठोकल्यात. या दोघांकडून चार पिस्तूल, ८ मॅग्झिन आणि ४७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या भागातून या कारवाईसह पोलिसांनी लष्कर ए तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटके केली आहे. रविवारी आदिल गनी दार या दहशतवाद्याला अटक केली होती. भारतीय लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठा दारूगोळाही जप्त केला गेला आहे. अशातच भारतीय लष्कर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवत असून या मोहिमेंतर्गत लष्कराकडून गुरूवारीही बारामुल्ला येथून एका दहशतवाद्याला अटक केली असल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community