खाजगी ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी, धुळ्यात एक जण ताब्यात

इंदौरहून गोव्याकडे धुळेमार्गे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी कारवाई करत एकाला रंगेहाथ पकडले. या व्यक्तीच्या ताब्यातून ४ किलो ८५५ ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.

( हेही वाचा : 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार की नाही? सरकारने स्पष्टचं सांगितलं…)

४ किलो ८५५ ग्रॅम गांजा हस्तगत 

इंदौर-गोवा ट्रॅव्हल्स क्र. एम.पी. ०९-एफ.ए. ९१५३ या ट्रॅव्हल्समध्ये निरज ललित कथुरीया नामक इसम गांजा नेत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने नायब तहसिलदार भाया भिमसिंग पावर यांच्या उपस्थितीत मुंबई-आग्रा महामार्गावर नगाव गावाजवळील हॉटेल अमोल जवळ रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास सापळा रचला. ट्रॅव्हल्स बस शिरपूरकडून धुळ्याकडे येतांना दिसल्याने या बसला थांबवून तपासणी केली. यात निरज ललित कथुरीया (वय २५) रा.वाबळे कॉलनी, फकीरवाडा, अहमदाबाद याच्या ताब्यातून २९ हजार १३० रुपये किंमतीचा ४ किलो ८५५ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला तसेच ५ हजाराचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. निरज कथुरीया विरुध्द पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here