नवी मुंबईत एक कोटींचे अमली पदार्थ जप्त; 16 नायजेरीयन अटकेत

152

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने खारघरमधील एका रो हाऊसवर छापा टाकत तब्बल एक कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये चरस, गांजा, एमडी यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक केली असून, यात 10 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.

खारघरमधील एका रो हाऊसमध्ये अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित रो हाऊसवर छापा टाकत, एक कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा: किरीट सोमय्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे कुटुंबाविरोधात दाखल केली तक्रार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.