Dudhsagar Waterfall Trek : ट्रेकिंगला जायचंय? मग दूधसागर धबधब्याबद्दलची ही माहिती वाचा!

96
Dudhsagar Waterfall Trek : ट्रेकिंगला जायचंय? मग दूधसागर धबधब्याबद्दलची ही माहिती वाचा!
Dudhsagar Waterfall Trek : ट्रेकिंगला जायचंय? मग दूधसागर धबधब्याबद्दलची ही माहिती वाचा!

दूधसागर धबधबा हा भारतातल्या गोवा राज्यातल्या मांडोवी नावाच्या नदीवरचा चार स्तर असलेला धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून रस्त्याने ६० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि रेल्वे मार्गाने गेलात तर बेळगाव-मडगाव या रेल्वे मार्गावरच्या मडगाव स्टेशनच्या पूर्व दिशेकडे साधारण ४६ किलोमीटर एवढ्या अंतरावर तर बेळगाव स्टेशनच्या दक्षिण दिशेकडे ८० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. (Dudhsagar Waterfall Trek)

दूधसागर धबधबा हा भारतातल्या सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक आहे. याची उंची ३१० मीटर म्हणजेच १०१७ फूट एवढी आहे आणि याची रुंदी ३० मीटर म्हणजेच १०० फूट एवढी आहे. (Dudhsagar Waterfall Trek)

(हेही वाचा- Jay Shah : जय शाहांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार?)

◆दूधसागर धबधबा नक्की कुठे आहे?

हा धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि पश्चिम घाटातल्या मोलेम राष्ट्रीय उद्यानात आहे. मांडोवी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळण्याआधी पश्चिम घाटापासून ते पणजी पर्यंतच्या प्रवासात हा धबधबा दिसतो. या अभयारण्याचा आणि खासकरून धबधब्याजवळचा हा संपूर्ण परिसर समृद्ध अशा जैवविविधतेने आणि पानगळीच्या जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यात हा धबधबा विशेष प्रेक्षणीय नसतो पण पावसाळ्यामध्ये हा धबधबा पावसाच्या पाण्याने ओसांडून वाहत असतो. जणू काही डोंगरावर पाण्याची मोठी चादर अंथलेली आहे असं दृश्य पावसाळ्यात पाहायला मिळतं. (Dudhsagar Waterfall Trek)

◆दूधसागर धबधब्यापर्यंत कसं पोहोचता येईल?

गोव्यातल्या कोलेम नावाच्या गावाजवळ भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आहे. तिथून टॅक्सीने दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचता येतं. इथला प्रवास करताना तुम्हाला जंगलातून आणि काही ठिकाणी जोरदार वाहणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहांमधून जाता येतं. सध्या धबधब्याकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. इथल्या असोसिएशनमधून जाण्याचा एक प्लस पॉइंट म्हणजे तुम्हाला दूधसागर धबधब्याचं संपूर्ण दृश्य पाहता येतं. जर तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करून गेलात तर तुम्हाला धबधब्याचं अर्धच दृश्य पाहता येईल. (Dudhsagar Waterfall Trek)

(हेही वाचा- ठाकरे-राणे वादावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar म्हणाले…)

◆दूधसागर ट्रेक

दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे कोलेमपासून ट्रेकची सुरुवात करायची. त्यानंतर पुढे धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जीप ज्या वाटेने जाते त्या वाटेने पायी चालत जायचं. (Dudhsagar Waterfall Trek)

दुसरा पर्याय म्हणजे रेल्वे ट्रॅकवरून आहे. हा मार्ग अंदाजे ११ किलोमीटर एवढा लांब आहे. पण या ट्रेकसाठी गोवा सरकारच्या वन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कारण या मार्गावर एक काळोखा बोगदा देखील आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसलेल्या रेल्वे ट्रॅकवरून चालणं खूप धोकादायक आहे. त्यासाठीच रेल्वे ट्रॅकमध्ये कोणीही चालताना आढळलं तर त्या व्यक्तीला मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढंच नाही तर ट्रेकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात डांबलं जाऊ शकतं. कारण रेल्वे नियमांनुसार रेल्वे मार्गावर चालणं हा गुन्हा आहे. (Dudhsagar Waterfall Trek)

(हेही वाचा- BMC Retired Employees : रजेचे पैसे रोखून पेन्शन, पीएफ, ग्रॅज्युएटीची रक्कम दुसऱ्याच महिन्यात जमा होणार खात्यात)

दूधसागर धबधब्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मे दरम्यान सर्वोत्तम काळ असतो. कारण या काळामध्ये पर्यटकांना धबधब्यामध्ये प्रवेश करण्यास परवानगी आहे. जीपसाठीही हा मार्ग या काळामध्ये खुला असतो. (Dudhsagar Waterfall Trek)

कोलेम इथल्या स्थानिक दूधसागर जीप असोसिएशनच्या काउंटरवरून पर्यटकांना जीप भाड्याने घेता येते. एका जीपमध्ये एकावेळी सात व्यक्ती प्रवास करू शकतात. जीप प्रवासासाठी प्रति व्यक्ती ₹५०० आकारले जातात. या जीपने पर्यटकांना धबधब्याच्या पायथ्याशी जाता येतं. हा धबधबा वन विभागाच्या अधिकारक्षेत्रात येतो. म्हणून पर्यटकांना त्यांच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी वन विभागाकडे प्रवेश शुल्क भरावं लागतं. (Dudhsagar Waterfall Trek)

(हेही वाचा- IPL Mega Auction : आयपीएल लिलावात लखनौ संघ रोहित शर्मासाठी उत्सुक, लावणार ५० कोटींची बोली?)

पर्यटक इथे ज्या जीपने येतात त्याच जीपने त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी परत कोलेमला सोडलं जातं. जीप सफारी अत्यंत मजेदार आणि रोमांचक आहे कारण धबधब्याकडे जाताना वाटेत वन्यजीव दिसण्याची शक्यता आहे. (Dudhsagar Waterfall Trek)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.