राज्यभरात जलप्रलयाचे आतापर्यंत ८९ मृत्यू! मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः हाहा:कार उडवला आहे.

188

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, चिपळूण, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून ८९ मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख, केंद्राकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात अली आहे.

मृतांचा आकडा वाढतोय!

महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी, २२ जुलै रोजी दुपारी ३५ घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत ३९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. पोसरे-बौद्धवाडीत घरांवर दरड कोसळून ही दुर्घटना घडली. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे यांसह अन्य घटनांत मृतांचा आकडा ७२ वर गेला आहे. दरम्यान राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

(हेही वाचा : कोकणावर जल आपत्ती! आता महाडमध्ये दरड कोसळली! ३६ जणांचा मृत्यू)

राज्यात कुठे किती मृत्यू?

  • चिपळूण, अपरांत कोविड सेंटरमध्ये पाणी साचले – ८ रुग्णांचा मृत्यू
  • तळीये, महाड दरड कोसळली – ३९ मृत्यू
  • चिपळूण, पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळली – १७ मृत्यू
  • आंबेघर, सातारा दरड कोसळली – १२ जणांचा मृत्यू
  • पोलादपूर, रायगड येथे दरड कोसळली – ११ जणांचा मृत्यू
  • वाई, सातारा दरड कोसळली – २ मृत्यू
  • कणकवली, दिगवळे, घर कोसळले – १ महिलेचा मृत्यू
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.