माहीम समुद्र किनाऱ्यावरील हत्या ब्लॅकमेलिंगमधून झाली?

135

माहीमच्या समुद्रकिनारी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी माहीम पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधात नागपूरकडे रवाना झाले असून एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. ही हत्या ब्लॅकमेलींगच्या वादातून झाली असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु आहे.

माहीम दर्गाचे दर्शन घेतले आणि…

माहीम येथील समुद्रकिनारी बसलेल्या एका प्रेमीयुगलांवर मंगळवारी मध्यरात्री दोन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. या हल्ल्यात मोहम्मद वसीम (२१) याचा मृत्यू झाला होता, तर त्याची प्रेयसी ही गंभीररीत्या जखमी झाली होती, तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे दोघे गोवंडी, शिवाजी नगर परिसरात राहणारे असून मंगळवारी रात्री माहीम दर्गा येथे दर्शनाला आले होते, त्यानंतर दोघे समुद्र किनारी गप्पा मारत बसलेले असताना ही घटना घडली होती. याप्रकरणी माहीम पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरु केला होता.

(हेही वाचा धक्कादायक! वन्यजीवांच्या शिकारीकरता गुन्हेगारांसाठी लॉकडाऊन ठरली ‘संधी’)

सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी ओळखले

पोलीस सूत्राच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात ठार झालेला तरुणाच्या मोबाईलमध्ये समलैंगिक संबंध असणाऱ्या दोन तरुणाचे व्हिडीओ होते, या व्हिडिओच्या माध्यमातून मोहम्मद वसीम हा या दोघांकडे पैशांची मागणी करीत होता, या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे दोघे हल्लेखोर शिवाजी नगर परिसरातील असण्याची शक्यता असून दोघे ट्रेन पकडून नागपूरच्या दिशेने पळून गेले आहे. माहीम पोलिसांचे एकी पथक नागपूर येथे रवाना झाले असून नागपूरमध्ये एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईकडे आणण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मात्र माहीम पोलिसांनी काही माहिती देण्यास नकार दिला असून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.