पुणे येथील कल्याणी नगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाचा डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) याच्या भोवती कायद्याचा फास दिवसागणिक आवळत चालला आहे. कारण अग्रवालच्या ‘बाळा’च्या रक्त चाचणीसाठी घेतलेले सॅम्पल आदला बदल केल्याचा आरोप तावरेवर आहे. कारण त्याने ‘बाळा’चे सॅम्पल घेतले परंतु ते कचऱ्यात फेकले, त्यानंतर ‘बाळा’ सोबत असलेल्या आईचे सॅम्पल घेतले आणि ‘बाळा’चे सॅम्पल म्हणून दाखवले. हे आता सिद्ध झाल्यामुळे डॉ. तावरेची सुटका शक्य नाही. त्यामुळे तावरेच्या अडचणी वाढणार आहे. याच तावरेने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येनंतर त्यांच्या शरीराचे शवविच्छेदन केले. त्यावेळी अनेक पुरावे गायब केल्याचा आरोप झाला आहे. हाच तावरे याआधी किडनी रॅकेटमध्ये अडकला होता. या प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते. तावरेने २००८ मध्येही अशाच एका खुनाच्या प्रकरणात शवविच्छेदनाचा संदिग्ध स्वरूपाचा अहवाल दिला होता, ज्यामुळे आरोपीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.
(हेही वाचा Pune Porsche Accident : नरेंद्र दाभोलकरांच्या शवविच्छेदनावेळी पुरावे गायब केल्याचा Dr. Ajay Taware वर संशय )
पुण्यातील खुनाचे प्रकरण
१७ जानेवारी २००८ रोजी विजय सूर्यवंशी यांचा पुणे जिल्ह्यातील वडगाव-बुद्रुक येथे धारधार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरून साध्या मातीचे नमुने, रक्ताने माखलेला चिखल, केस आणि फरशीचा तुकडा जप्त करण्यात आला आहे. मात्र पुढील तपासात पोलिसांनी आरोपीला पकडले, त्यावेळी त्याने चॉपरच्या साहाय्याने हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी ते चॉपर आरोपीने लपवलेल्या ठिकाणाहून जप्त केले. ससून हॉस्पिटलचा डॉ. अजय तावरेने (Dr. Ajay Taware) शवविच्छेदन केले. डॉ.अजय याने मृतदेहावरील जखमांचे वर्णन केले.
(हेही वाचा Porsche Accident Pune : किडनी तस्करीतही अडकलेला Dr. Ajay Taware)
उच्च न्यायालयाने तावरेचा अहवालावर ठेवला ठपका
जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला शिक्षा सुनावली, मात्र आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले. ‘बिट्ट्या भाऊसाहेब पडाळे विरुद्ध महाराष्ट्र शासन’ अशा या याचिकेवर युक्तिवाद झाला, तेव्हा न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती पी.व्ही. हरदास यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. त्यामध्ये न्यायालयाने सशक्त पुराव्यांच्या अभावामुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध होत नाही, त्यामुळे खालच्या न्यायालयाने आरोपीला ठोठावलेली शिक्षा रद्द करून त्याला निर्दोष सोडून देत आहोत, असा आदेश दिला. निकालपत्रात न्यायालयाने म्हटले, ‘डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) यांनी शवविच्छेदन अहवाल दिला, अपीलकर्त्यांने गुन्ह्यात कोणती शस्त्रे वापरली असतील, ज्याद्वारे मृताच्या शरीरावर जखमा झाल्या, त्याचे वर्णन या शवविच्छेदन अहवालात दिलेले नाही, जे अत्यावश्यक होते. जेणेकरून मृत व्यक्तीला झालेल्या जखमा आणि पोलिसांनी जप्त केलेले शस्त्र याचा संबंध लागत नाही. शिवाय आरोपींच्या सांगण्यावरून जी शस्त्रे जप्त केली गेली तेव्हा पंचांच्या उपस्थितीत ती सील केली गेली होती. आरोपींनी केलेल्या गुन्ह्याशी शस्त्रे जुळणे अत्यावश्यक आहे, हे दर्शविणारा कोणताही पुरावा नाही. अशा प्रकारे सशक्त पुराव्याच्या अभावामुळे आम्ही ट्रायल कोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे या आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात यावे’, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
उच्च न्यायालयाने खुन्याला निर्दोष सोडताना मुख्य मुद्दा हा तावरेने (Dr. Ajay Taware) केलेल्या संदिग्ध शवविच्छेदनाचा केला, यावरून तावरेचे आरोपीच्या बाजूने शवविच्छेदनाचे अहवाल देणे, आरोपींचे रक्त चाचण्या बदलणे हे धंदे १२ वर्षांपासून सुरु आहेत, हे दिसून येते.
Join Our WhatsApp Community