लम्पी आजारामुळे देशात आतापर्यंत 82 हजार प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरांना होणारा लम्पी हा आजार महाराष्ट्रात अधिक बळावताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी आजाराची लागण होत आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात 47, अहमदनगर जिल्ह्यात 21, धुळ्यात 2, अकोल्यात 18, पुण्यात 14, लातूरमध्ये दोन, सातारा जिल्ह्यात 6, बुलढाण्यात 5, अमरावती जिल्ह्यात 7, एक अशा एकूण 126 संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, वाशीम, नागपूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
( हेही वाचा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणार – मुनगंटीवार)
प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये
लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार सतर्क झाले असून, रोगावर नियंत्रणासाठी मिळवण्यासाठी आणि विविध उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरात लम्पीच्या लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. लम्पी या आजारामुळे अचानक जनावरे दगावत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून उपाययोजनाही राबवण्यात येत आहेत. तसेच जनावंराच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community